मैसूरच्या महाराजांनी सुरु केलेल्या मैसूर सॅन्डल सोपची रोचक कहाणी

दिवाळी आणि सुगंधी साबण यांचं समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही.

आणि त्याचमुळे हे सुगंधी साबण आपल्या भारतात काही रंजक इतिहासातून पुढे आलेले आहेत.

असाच सुगंधी साबणांचा विषय निघाला की आपल्याला आठवतो तो म्हणजे ‘मोती साबण’ आणि ‘मैसूर सँडल सोप’

यातल्या मैसूर सँडल सोपचा इतिहास ३०-४० वर्षे नाही तर तब्बल १०० वर्षांपेक्षा सुद्धा जुना आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की १९१६ साली मैसूरच्या महाराजांनी मैसूर सँडल सोप सगळ्यात पहिल्यांदा तयार केला.

हो एखाद्या राजाने उद्योपती असण्याची ही भारतातली पहिलीच घटना.

हा साबण सर्वात पहिल्यांदा का तयार केला गेला, त्यामागे प्रेरणा काय होती, याची रोचक गोष्ट या लेखात तुम्हाला वाचायला मिळणार आहे. 

१९१६ साली जगभरातील सर्वात जास्त चंदनाचे उत्पादन मैसूरमध्ये होत असे.

पण दुसऱ्या महायुद्धामुळे चंदनाचा व्यापार ठप्प झाला होता.

या काळात भरपूर प्रमाणात चंदन साठून राहिले होते.

या साठलेल्या चंदनाचा उपयोग करण्यासाठी चौथे कृष्ण राजा वोडीयार आणि दिवाण मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी या चंदनच्या खोडातून तेल काढण्यासाठी एका कारखान्याची स्थापना केली. 

हो, हे तेच सर. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर १५ सप्टेंबरला इंजिनिअर्स डे साजरा केला जातो.

दोन वर्षे या कारखान्याचे काम सुरळीत सुरु होते. तेव्हाच एके दिवशी महाराजांना चंदनाच्या तेलापासून तयार केलेला साबण भेट म्हणून मिळाला.

या साबणावर महाराज इतके खुश झाले की आपल्या प्रजेसाठी सुद्धा असाच साबण तयार करावा असे त्यांना वाटले. 

त्यांच्या मनातील ही इच्छा त्यांनी आपले दिवाण मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना बोलून दाखवली.

आपले प्रत्येक काम मन लाऊन करणारे एम्. विश्वेश्वरैया सुद्धा लगेच कामाला लागले.

महाराजांना प्रजेसाठी असा साबण तयार करायचा होता ज्याचा दर्जा उत्कृष्ट असेल पण त्याच बरोबर त्याची किंमत सुद्धा सामान्य नागरिकाला परवडेल इतकीच असेल. 

यासाठी त्यांनी खास मुंबईतून तंत्रज्ञान विशेषज्ञांना आमंत्रित केले. 

मैसूरचे पूर्वीचे दिवाण के. शेषाद्री अय्यर यांनी १९११ साली भारतीय विज्ञान संस्थानाची स्थापना केली होती.

याच संस्थानाच्या आवारात साबण तयार करण्याची तयारी सुरु झाली होती. 

साबणाचा दर्जा उत्तम व्हावा, त्यात कुठलीही कमतरता राहू नये म्हजून भारतीय विज्ञान संस्थानाचे रसायनतज्ञ सोसले गरलापुरी शास्त्री यांना साबण तयार करायचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. 

साबणाबाबतीत हवे ते ज्ञान प्राप्त करून सोसले गरलापुरी शास्त्री भारतात परतले. 

मैसूरमध्ये राजा वोडीयार, चौथे आणि दिवाणजी त्यांच्याच परतण्याची प्रतीक्षा करत होते.

साबण तयार करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून सोसले गरलापुरी शास्त्री मैसूरला परत आल्यावर लगेचच शुद्ध चंदनाच्या तेलापासून साबण तयार करण्याचे काम सुरु केले गेले.

बंगळूरच्या आर. सर्कल जवळ सरकारी साबणाच्या कारखान्याची स्थापना झाली. 

त्याच दरम्यान साबण तयार करताना शुध्द चंदनाच्या तेलाची कमतरता भासू नये यासाठी मैसूर येथे चंदनाच्या लाकडांपासून तेल काढण्यासाठी एक कारखाना स्थापन केला गेला.

साबणाचे उत्पादन सुरु झाले. त्यानंतर १९४४ साली शिवमोगा या ठिकाणी सुद्धा चंदनाच्या लाकडातून तेल काढण्यासाठी कारखाना उभारला गेला.

मैसूर सँडल सोप बाजारात आल्यावर अल्प काळातच अत्यंत लोकप्रिय झाला.

यामुळेच सोसले गरलापुरी शास्त्री यांना ‘साबुन शास्री’ सुद्धा म्हटले जायचे. 

साबुन शास्त्री मात्र एवढ्यावर समाधान मानण्यातले नव्हते.

त्यांनी चंदनाच्या तेलापासून अत्तर सुद्धा तयार केले त्याच बरोबर मैसूर सँडल सोपमध्ये सुद्धा ते वेळोवेळी बदल करत राहिले. 

त्या काळात साबणाचा आकार सहसा आयताकृती असायचा.

पण मैसूर सँडल सोपला अंडाकृती आकार दिला गेला.

साबण ठेवण्यासाठी दागिन्यांची डबी असते अगदी तशीच आयताकृती डबी तयार करण्यात आली.

त्यावर फुलांच्या नक्षीची प्रिंट होती.

मैसूर सँडल सोप या डबीत ठेवताना एखाद्या दागिन्यासारखाच मऊ कपड्यात गुंडाळून ठेवला जायचा. 

मैसूर सँडल सोप कंपनीचा लोगो ठरवताना सुद्धा अनेक बारकावे लक्षात घेतले गेले होते.

लोगोवर ‘शराबा’ या प्राण्याचे चित्र आहे.

शराबा हा एक काल्पनिक प्राणी आहे ज्याचे शरीर वाघाचे आणि मुंडके हत्तीचे आहे.

हा काल्पनिक प्राणी म्हणजे साहस (वाघ) आणि ज्ञान (हत्ती) यांचे प्रतीक. 

मैसूर सँडल सोपच्या डबीवर ‘श्रीगंधा तवरिनिंडा’ हे छापण्यात आले, याचा ‘अर्थ -चंदनाच्या मातृगृहातून..’ म्हणजेच मैसूर मधून. 

अशाप्रकारे मैसूर सँडल सोपच्या आकारापासून, पॅकिंग ते लोगो पर्यंत सगळा विचार अत्यंत बारकाईने केला गेला होता.

त्याचप्रकारे साबणाच्या जाहिरातींचा, प्रसाराचा विचार सुद्धा केला गेला होता.

ट्रामची तिकिटे, काड्यापेट्या, साईनबोर्ड सगळीकडे मैसूर सँडल सोप झळकत होता.

अर्थातच हा सुगंधी साबण भारतात लोकप्रिय झाला. 

या मेहनतीमुळे भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा साबणाची मागणी वाढायला लागली होती.

इतर देशातील राजेशाही घराण्यातून सुद्धा मैसूर सँडल सोपची मागणी होत होती.

१९८० साली मैसूर आणि शिवमोगा मधील तेल कारखान्यांना कर्नाटक साबुन और डिटर्जंट लिमिटेड या कंपनीसोबत एकत्र केले गेले.

१९९० साली मात्र वाढती स्पर्धा, कमी झालेली मागणी अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे कंपनीचा मोठा तोटा झाला.

पण कंपनीने मेहनत वाढवून, होणाऱ्या बदलांचा स्वीकार आणि सामना करून हे नुकसान भरून काढले २००३ साली कंपनीने सगळे कर्ज चुकते केले.

एव्हान मैसूर सँडल सोप बरोबर अगरबत्ती, तेल, हँड वाॅश, फेस पावडर याचे सुद्धा उत्पादन सुरु झाले. 

२००६ साली मैसूर सँडल सोपला GI टॅगने सन्मानित केले गेले.

याचा अर्थ सँडल सोप कुठली ही कंपनी तयार करू शकते परंतु मैसूर सँडल सोप असण्याचा दावा करू शकत नाही.

ते हक्क केवळ कर्नाटक साबुन और डिटर्जंट लिमिटेड या कंपनी पुरतेच मर्यादित आहेत. 

आज सुद्धा मैसूर सँडल सोप हे कर्नाटक साबुन और डिटर्जंट लिमिटेडचे प्रमुख उत्पादन आहे.

हा जगातील एकमेव साबण आहे जो चंदनाच्या शुद्ध तेलापासून तयार केला जातो.

या साबणाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

त्यामुळे कर्नाटक साबुन और डिटर्जंट लिमिटेडची उत्तरोत्तर प्रगतीच होत आहे. 

आजच्या तारखेला बाजारात अनेक विदेशी साबण मिळतात पण आपल्या भारतीयांच्या घरात या मैसूर सँडल सोपला एक वेगळेच स्थान आहे.

दिवसेंदिवस य साबणाची मागणी वाढतच चालली आहे.

ही मागणी पूर्ण करण्यासाठी कर्नाटक साबुन और डिटर्जंट लिमिटेडद्वारा शेतकऱ्यांसाठी ‘ग्रो मोअर सँडलवूड’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

जेणेकरून चंदनाची वाढत असलेली मागणी पूर्ण होऊ शकेल. 

साबण तयार करण्याच्या सुरुवातीच्या काळात घेतलेली मेहनत, बारकाईने केलेले विचार या सगळ्याचा परिणाम म्हणूच आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा इतर साबण कंपन्या या साबणावर मात करू शकल्या नाहीत आणि या साबणाचे इतके महत्व टिकून आह. 

आता जात जात एका प्रश्नाचे उत्तर द्या, भारतात बनलेला पहिला स्वदेशी साबण कोणता आणि तो किती साली सुरु झाला?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मैसूरच्या महाराजांनी सुरु केलेल्या मैसूर सॅन्डल सोपची रोचक कहाणी”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।