तुमची आजी आंबे पाण्यात भिजवून मग खायला देते का? यामागे आहे विज्ञान.
आंबा पाण्यात बुडवून, भिजवून ठेवणे यामागे आंब्याचा चिक किंवा धूळ साफ करणं एव्हढचं कारण नाही, तर या परंपरेमागे आहेत वैज्ञानिक कारणं.
उन्हाळाचा सीझन आला की घरामध्ये आंबे मोठ्या प्रमाणात आणले जातात, घरचे आंबे असतील तर ते काढून आढी घातली जाते.
जुने जाणते लोक, विशेषत: आजी आंबे चिरण्याआधी किंवा त्याचा रस काढण्याआधी एखाद्या पातेल्यात पाणी भरून त्यात आंबे बुडवून ठेवते.
यामुळे धूळ, चिक निघून जातातच त्याचबरोबर आंब्यावर फवारलेली कीटकनाशकं निघून जायला ही मदत होते.
याचबरोबर आणखी कोणते फायदे होतात ते ही आज जाणून घेऊया.
१) फायटिक ऍसिडपासून मुक्ती.
फायटिक ऍसिड हे असं पोषक तत्व आहे जे आरोग्यासाठी जसं पोषक आहे तसंच हानीकारक ही आहे.
फायटिक ऍसिड लोह, जस्त, कैल्शीअम आणि अन्य काही खनिजांच्या शोषणाला विरोध करतं त्यामुळे या खनिजांची शरीरात कमतरता निर्माण होते.
आंब्यामध्ये असणारा फायटिक ऍसिडचा अणू बऱ्याच फळांमध्ये, भाज्यांमध्ये आणि काजूमध्ये ही असतो.
त्यामुळेच आंब्याला जर काही तास पाण्यात भिजवून ठेवले तर शरीरात ऊष्णता निर्माण करणारं अतिरिक्त फायटिक ऍसिड कमी व्हायला मदत होते.
२) रोगांपासून बचाव
एका संशोधनानुसार आंबा पाण्यात भिजवून ठेवून मग खाल्ला तर मुरूम पुटकुळ्यांना अटकाव होतो.
त्याचबरोबर डोकेदुखी, बद्धकोष्ठता आतड्यांचे विकार आणि त्वचेच्या समस्यांना ही दूर ठेवायला मदत होते.
तज्ञांच्या मते फळं पाण्यात भिजवल्यामुळं त्यांच्यातली उष्णं तत्वं कमी होऊन अतिसार, पिंपल्स अशा समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
३) रासायनिक पदार्थांपासून मुक्ती
पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारी कीडनाशकं आणि कीटकनाशकं विषारी असतात. ज्यांचा श्वसनावर थेट परिणाम होत असतो.
श्वसनमार्गाची जळजळ अँलर्जी, डोकेदुखी, डोळे आणि त्वचेची जळजळ, मळमळ असे विविध दुष्परिणाम त्यामुळे अनुभवायला मिळतात.
आजकाल आंबा लवकर पिकण्यासाठी ही त्यावर केमिकल लावलेलं असतं ज्याचे ही शरीरावर वाईट परिणाम होतात.
पण समजा आंबा किंवा फळं भिजवून ठेवून खाल्ली तर असे तीव्र परिणाम बऱ्याच अंशी कमी होतात.
४) फळातील उष्णता कमी करायला मदत होते
आंबा हे उष्ण फळ मानतात.
आंबा खाल्यामुळे शरीरातील उष्णता ही वाढते.
भिजवलेल्या आंब्यामुळे ही उष्ण प्रवृत्ती कमी व्हायला मदत होते.
५) फॅट कमी होतं.
आंब्यात फायटोकेमीकल्सची मात्रा भरपूर प्रमाणात असते.
आंबा भिजवला की फायटोकेमीकल्सची
तीव्रता कमी होऊन शरीरातील फँट जळायला मदत होते.
कुठलंही फळं खाण्याआधी आपण पाण्यातून धुवुन घेतो.
फळांचा राजा आंबा! त्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी त्याला व्यवस्थित बुडवून ठेवून भिजवा आणि मग खा.
तुम्हांला कोणता आंबा आवडतो? हापुस, तोतापुरी, पायरी, लंगडा की आणखी कुठला ?
आम्हांला कमेंट नक्की कळवा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
आम खाना आम बात है।
लेकिन
आम पानी में भिगोकर खाना ये
खास बात है।