कशी असतात ही आनंदी माणसं? मोकळ्या मनाची भरभरून कौतुक करणारी, नवनवीन कल्पना राबवणारी….
अशी दिलखुलास माणसंच आनंदी असतात. त्यांना संगीत आवडतं. ते उत्तम वाचतात. क्लासिक मूव्हीज बघतात, आणि चांगल्या व्यक्तींशी सुसंवाद साधतात.
थोडक्यात म्हणजे त्यांच्यात असणारा आनंद ते सतत द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतात.
तुम्हाला असं वाटतंय का की हे अवघड आहे?
थांबा! आज काही सोपे मार्ग आम्ही तुम्हाला सुचवू.
ते वाचून तुम्हीच सांगा, आनंदी राहणं आणि आनंदाची पखरण करणं खरंच अवघड आहे का?
नेमकी करतात तरी काय ही आनंदी माणसं? तुम्ही पण फॉल़ो करा हे सोपे मार्ग.
1) आजचा दिवस अप्रतिम आहे हे ठरवा.
रात्रीचा अंधार दूर करून नव्या दिवसाचे स्वागत करताना, एका भन्नाट दिवसाच्या स्वागतासाठी तयार रहा.
तुम्हाला तर माहितीच आहे, की जसा तुम्ही विचार करतात तसं आयुष्य तुम्हाला सामोरं येतं.
तर एका सुंदर दिवसाच्या स्वागताला जर तुम्ही सज्ज झालात तर एक सुंदर दिवसच समोर येईल. बरोबर ना?
2) दिवसाची सुरुवात सुहास्यवदनाने करा.
जेंव्हा जेंव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ओढून ताणून का होईना हसू आणता तेंव्हा तुमची निराशा कुठे पळून जाते तुमच्या लक्षातही येत नाही.
तुम्ही खरंच हसू अनुभवाला शिकता.
स्वतः ला हसण्याची आठवण करून देण्यासाठी सुंदर सुंदर विचार छान छान गोष्टी कागदावर लिहून आरशावर, फ्रिजवर, बाथरूम मध्ये तुमच्या नजरेसमोर राहतील अशा चिकटवून ठेवा, ते वाचा आणि चेहऱ्यावर मस्त हसू झळकू द्या !
3) नवं काहीतरी ट्राय करा.
घर ते ऑफिस रोजचा रस्ता सोडून नवीन रोड ट्राय केला आहे? वेगळ्या दुकानात कधी खरेदी केली आहे? करून बघा.
रोजचाच रस्ता, रोजचं रुटीन जरासं बदलून बघा.
आत्तापर्यंत जे केलेलंच नाही आहे ते करून बघा.
चित्र काढता येत नाही? काढून बघा. गाता येत नाही? अहो गाणं म्हणून तर बघा!
डान्स तर नक्कीच करून बघा.
नवखेपणाचा, पहिल्या अनुभवाचा ताजेपणा तुमच्या व्यक्तिमत्वालाही ताजतवानं करून टाकेल.
4) अंतर्मनाचा आवाज ऐका.
आयुष्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी तुम्ही खूप तडजोडी केल्या असणार.
आज तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे या तडजोडींची फारशी गरज उरलेली नाही.
तरीही तुम्ही स्वतःसाठी न जगता परिवाराचा विचार करता, आणि तडजोडीतून बाहेरच पडत नाही.
पण जेव्हा तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून जगता तेंव्हा तुम्ही Happy आणि तुमची फॅमिली Happy Happy..!!
5) खुल्या दिलानं कौतुक करा.
आपल्या ओळखीच्या, अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचं मुक्त मनाने कौतुक करा.
एखादा ड्रेस छान असल्याचे आवर्जून सांगा.
पदार्थ उत्तम झाल्याचं सांगा, किंवा एखादा काम, एखादा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्याचं सगळ्यांसमोर कौतुक करा.
ज्याचं कौतुक कराल ती व्यक्ती सुखावेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती हसू उमटेल.
6) जगण्याचा स्पीड थोडा कमी करा.
जर तुम्ही तुमच्या आयुष्याचा स्पीड वाढवतच गेला तर छोट्या छोट्या आनंदी गोष्टी मागे पडतील.
आयुष्याच्या स्पीड जरा कमी करा एक ब्रेक घ्या .
आता दीsssर्घ श्वास घ्या. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि तुम्ही नेमकं काय करत आहात याचा अंदाज घ्या.
ज्याची खरंच गरज नाही अशी कामं सोडून द्या आणि ज्यावर तुमची छाप पडेल अशी काम आवर्जून करा.
7) सतत हालचाल करत रहा.
अवघडून कोपर्यात कुठेतरी बसून आयुष्य निरस करू नका.
उड्या मारा, बागडा, झाडावर चढा, चाला झुम्बा डान्स करा, पॉवर वॉक घ्या काहीही करा.
तुम्हांला ज्या आवडतील त्या कोणत्याही हालचाली करा.
आवडेल ते करा आणि स्वतःला मोकळ होवू द्या. तुमच्या शरीरातलं रक्त सळसळू द्या.
8) खळखळून हसा
अशा माणसांबरोबर मैत्री करा ज्यांच्याशी गप्पा मारताना तुम्ही खळखळून हसाल.
कधीतरी आवर्जुन स्कीट्स बघा, कथाकथन ऐका पुलंची पुस्तकं वाचा पण डोळ्यात पाणी येईपर्यंत हसा!
9) नवनवे मित्र-मैत्रिणी जोडा
माणूस ही अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
एक नमुना दुसऱ्या सारखा नसतो.
आणि म्हणूनच स्वभावाच्या वेगवेगळ्या तऱ्हा अनुभवा, म्हणजे आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील.
10) नव्या संधीला स्वीकारा
आयुष्य एका सरळ रेषेत धावत असतं.
पण अशा वेळेला एखादी अनपेक्षित संधी टकटक करते.
तिला सोडून देऊ नका त्या संधीचं सोनं करा
11) झालं गेलं विसरून लोकांना माफ करा.
खरंच मित्रांनो आयुष्य छोटसं आहे. खूप काळ नाराज राहू नका.
एखाद्या मित्राची झालेली चूक विसरून जा पुन्हा एकदा मैत्रीचा हात तुम्ही स्वतःहून पुढे करा.
12) मदतीचा हात पुढे करा.
तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणी ना कोणी मदत केलेली असते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला पैशात मोजता येत नाही किंवा त्याची परतफेड पैशात करता येत नाही.
पण मग तुम्ही पण दुसऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करू शकता.
समजा तुमच्या बिल्डींगमधून काही मुलं ग्राउंडला किंवा क्लासला जात असतील तर कधीतरी या मुलांची जबाबदारी घेऊन त्यांना एकत्र सोडा किंवा घेऊन या.
तुमच्या भाजीबरोबर दुसऱ्यांची एखादी भाजी आणा, किंवा एखादं छोटंसं काम करून टाका.
तुम्हांला भरभरूनआशीर्वाद मिळतील आणि मन समाधानाने भरून जाईल.
13) सकारात्मक शब्दांचा वापर करा.
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ दे हताश होऊ नका.
स्वतःला आणि इतरांना सकारात्मक शब्दानं प्रोत्साहन देत रहा.
14) मुलांबरोबर वेळ घालवा.
तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर आनंदाचा निखळ झराच तुमच्या जवळ आहे.
ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे.
मुलांबरोबर खेळा, दंगा करा, मुल होऊन त्यांच्यामध्ये रमा.
15) स्वतःसाठी वेळ काढा.
हे तर प्रत्येक जण कित्येक वेळा सांगत असतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
स्वतःसाठी वेळ काढा. खरंच हो, स्वतःसाठी खरंच अगदी थोडासा का होईना पण वेळ काढा.
दिवसातली काही वेळ स्वतः साठी ठेवा.
वाचा, गाणी ऐका, फिरा किंवा अगदी शांत बसा.
पण हा ठराविक वेळ तुमचा स्वतःचा आहे हे लक्षात ठेवून त्याचा वापर करा.
आनंद म्हणजे तरी काय हो? छोट्या छोट्या सुंदर क्षणांची भरलेली पोतडी, जी कधीच संपत नाही.
तुम्ही फक्त जाणीवपूर्वक छोटे-छोटे आनंदी, सुखी क्षण निर्माण करा.
आता पटलं ना की सुखी होणं, आनंदी होणं हे फारसे अवघड नाही.
प्रत्येकाला ते सहज शक्य आहे. तर तुम्ही सुद्धा यातले मार्ग वापरायला सुरुवात करा आणि आनंदाचा एक वेगळाच अनुभव घ्या.
तुम्हाला आलेला अनुभव आमच्याशी शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप छान माहिती