मायक्रोग्रीन्स…. आरोग्याचा अमूल्य ठेवा

मायक्रोग्रीन्स म्हणजे धान्य किंवा भाजी रुजताना अंकुरीत झाल्यावर येणारे छोटेसे रोप. मायक्रो म्हणजे अगदी लहान व ग्रीन्स अर्थात हिरव्या किंवा इतर रंगाच्या पालेभाज्या किंवा अंकुरीत बियांपासून निर्माण झालेले कोवळे रोप.

हे मायक्रोग्रीन्स शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यांचे औषधी गुणधर्म, हे घरच्या घरी कसे उगवायचे ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा.

काय आहेत मायक्रोग्रीन्स?

बियांपासून रुजवलेली साधारण एक ते तीन इंच उंचीची हिरवी किंवा रंगीत कोवळी भाजी म्हणजे औषधी गुणांचे भांडार असलेली मायक्रोग्रीन्स.

यांना एक प्रकारचा अरोमा असतो त्यामुळे या सुगंधाने मन प्रसन्न होते.

विविध प्रकारचे मायक्रोग्रीन्स कोणते आहेत?

  • ब्रोकोली
  • गाजर
  • तुळस
  • आले
  • लसूण पात
  • मोहरी
  • बीटरुट
  • वाटाणा
  • चवळी
  • मेथी
  • कोबी
  • कॉलीफ्लावर
  • लेट्यूस
  • सेलेरी
  • सूर्यफूल
  • गव्हांकुर
  • नवलकोल
  • अल्फाल्फा
  • पालक

अशी अनेक प्रकारची मायक्रोग्रीन्स खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असतात.

मायक्रोग्रीन्स आणि अंकुरीत धान्ये यात काय फरक आहे?

मायक्रोग्रीन्स जमिनीत उगवतात व वाढतात तर अंकुरीत धान्य पाण्यात भिजवून मग त्यांना मोड काढले जातात.

मायक्रोग्रीन्सची पाने व देठ खाण्यासाठी वापरतात तर अंकुरीत धान्यांच्या बिया.

मायक्रोग्रीन्स वाढण्यासाठी एक ते तीन आठवडे लागतात तर धान्य अंकुरित होण्याची प्रक्रिया लवकर होते.

मायक्रोग्रीन्सची वाढ होण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी लागते तर अंकुरण प्रक्रियेसाठी उजेडाची आवश्यकता नसते. अंकुरित धान्याच्या तुलनेत मायक्रोग्रीन्स अधिक पौष्टिक आणि सुरक्षित आहेत कारण ही भरपूर सूर्यप्रकाशात वाढत असल्याने यावर बॅक्टेरीया वाढण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

मायक्रोग्रीन्स घरच्या घरी उगवण्याची सोपी पद्धत.

धान्य किंवा भाजीच्या बिया घेऊन सात ते आठ तास पाण्यात भिजवून घ्या.

एक ट्रे किंवा पसरट डिश घेऊन त्यात कोकोपीट किंवा ग्रोइंग मॅट ठेवा व पाण्याचा फवारा मारुन किंवा हाताने पाणी शिंपडून नीट भिजवून घ्या.

त्यावर या बिया पसरुन रुजत घाला.
याला नीट कव्हर करा. चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा खिडकीजवळ ठेवा. काही काळानंतर बिया अंकुरित होतील.

नंतर वरचे कव्हर काढा व रंगीत पाने येईपर्यंत ही छोटी रोपे वाढू द्या.

रोज पाणी घाला. ही रोपे एक ते तीन इंच उंचीची होईपर्यंत वाढवून मग कापून उपयोगात आणा.

या सोप्या पद्धतीने आपण कमी जागेत, बाल्कनीत किंवा गॅलरीत सुद्धा सहजपणे मायक्रोग्रीन्स वाढवू शकतो.

मायक्रोग्रीन्सचा आहारात समावेश करण्याचे फायदे.

१. ब्रोकोली हे कॅन्सरशी लढा देणारे उपयुक्त मायक्रोग्रीन असून याच्यातील सल्फोराफेन हे कॅन्सरच्या पेशींविरोधी काम करते.

२. यांच्यातील मायक्रोन्यूट्रिएंट्स अनेक दीर्घकालीन आजारांवर उपयुक्त आहेत.

३. यात मिनरल्स ची मात्रा भाज्यांपेक्षाही जास्त प्रमाणात असते.

४. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त.

५. यात असलेल्या भरपूर ॲंटीऑक्सीडंट्स मुळे शरीर निरोगी रहाते.

६. पूर्ण वाढ झालेल्या भाज्यांच्या तुलनेत मायक्रोग्रीन्समध्ये चाळीस पट जास्त पोषणमूल्य असतात.

७. वजन कमी करण्यासाठी उपयोगी.

८. यांच्यामधील चांगले बॅक्टेरीया आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रिबायोटिक म्हणून काम करतात.

९. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त.

१०. व्हिटॅमिन A, C, E, K बीटा कॅरोटीन, ल्यूटीन यांनी युक्त असलेले हे मायक्रोग्रीन्स शरीराला भरपूर पोषणमूल्य पुरवतात.

मायक्रोग्रीन्स कसे खावेत?

सलाड, पिझ्झा टॉपिंग, सूप, करीज, ऑमलेट, किंवा तव्यावर नुसतेच परतून, ज्यूस या स्वरूपात तुम्ही आहारात मायक्रोग्रीन्सचा समावेश करु शकता.

हे क्रंची म्हणजे कुरकुरीत आणि चविष्ट तर असतातच पण यांचा सुंदर रंग आणि सुवासिक अरोमा खाण्याची लज्जत वाढवतो.

एवढ्या छोट्या आकाराचे असूनही यांच्यातील जीवनसत्त्वे, खनिजे यांचे भांडार पाहून यांना मूर्ती लहान पण कीर्ती महान असेच म्हणावे लागेल !!!

घरच्या घरी उगवलेल्या मायक्रोग्रीन्सचा साठा जर तुम्ही योग्य प्रकारे केलात तर अधिक काळपर्यंत हे टिकून रहातात.

मायक्रोग्रीन्स साठवण्यासाठी योग्य पद्धत कोणती?

हे साठविण्यासाठी सर्वात सोपी आणि टिकाऊ पद्धत म्हणजे दमट कपडा किंवा टिश्यू पेपर मध्ये गुंडाळून ठेवणे.

आणि ही गुंडाळी प्लास्टिक बॅग किंवा डब्यात भरुन फ्रीजमध्ये ठेवणे. आवश्यक तेवढा दमटपणा मिळाला की आठवडाभर हे छान टिकतात. पाहिजे तेव्हा फ्रीजमधून काढून तुम्ही यांची रेसिपी बनवू शकता.

मायक्रोग्रीन्स एकदा का तुम्ही खुडून घेतलीत की मग मात्र यांचा सूर्यप्रकाशाशी संबंध येऊ देऊ नये. अन्यथा त्यांच्या चवीत फरक पडतो.

त्याचप्रमाणे हे स्वच्छ करताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. थंड पाण्यात हळूवारपणे धुवून मग हे निथळून घ्यावेत. वापरण्यापूर्वी लगेचच धुवून रेसिपीमधे वापरावे. धुवून जर फ्रीजमध्ये ठेवले तर ओलसरपणामुळे लगेच खराब होतात.

कटिंग करताना मुळापासून उपटून काढू नये.वरच्यावर कात्रीने कापून घ्यावे.यामुळे याला परत पाने फुटतात व नवीन बॅच तयार होते.

तर अशी ही सहजपणे उगवू शकणारी, अनेक पदार्थांची चव वाढविणारी आणि शरीराचे उत्तम पोषण करणारी मायक्रोग्रीन्स !!!

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कमेंट्स करुन सांगा.तुम्ही कोणते मायक्रोग्रीन्स आहारात वापरता का? तुम्ही यांची रेसिपी बनवता का? असल्यास जरुर शेयर करा.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।