रस्त्यांवरचे खड्डे (पॉटहोल) हा आपल्याकडे नेहमीच हिरीरीने बोलला जाणार विषय. या खड्ड्यांचा विषय चर्चेत आणण्यासाठी कोणीतरी कलात्मकतेने एखादा व्हिडीओ करतं ज्यात ते पॉटहोल आणि चंद्राच्या जमिनीमध्ये तिळमात्रही फरक नाही हे उपहासाने दाखवून दिलेलं असतं. नाहीतर मलिष्काचं एखादं गाणं येतं आणि अफाट व्हायरल होऊन थोड्या दिवसांसाठी धमाल उडवून देतं.
पण मुंबईच्या रस्त्यांवर एक असा माणूस पण दिसतो जो आपल्या बरोबर पेव्हर ब्लॉक्सचे तुकडे, खडी फावडं असे खड्डे भरण्यासाठीचे समान घेऊन फिरतो. आणि जिथे खड्डा दिसेल तिथे या समानाने तो खड्डा भरतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे तो एक-दोन महिन्यांपासून नाही तर तब्बल चार वर्षांपासून करतो आहे. आणि हो यामागे व्हायरल होण्याचा कुठलाही हेतू या माणसाचा नाही हे विशेष. या माणसाचं नाव आहे दादाराव बिल्होरे.
२८ जुलै २०१५ ला दादारावांचा १६ वर्षांचा मुलगा प्रकाशचा अपघातात मृत्यू झाला. त्या दिवशी प्रकाश जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडने घरी येत होता आणि येताना रस्त्यात एका ठिकाणी पाणी भरलेलं असल्याने खड्डा दिसला नाही. आणि यात बुडून प्रकाशाचा मृत्यू झाला.
Dadarao Bilhore has been filling potholes in Mumbai for past 3 yrs after he lost his 16-year-old son to a pothole on a rainwater clogged street on July 28, 2015; says, 'our nation has a huge population. If even 1 lakh of us start filling potholes, India will become pothole-free' pic.twitter.com/pOQ1j6Sbmz
— ANI (@ANI) July 29, 2018
तरुण मुलाच्या मृत्यूने दादारावांचं आयुष्यच बदलून गेलं. यानंतर त्यांनी ठरवलं की खड्यात बुडून आता परत कोणाचाही मृत्यू व्हायला नको. तेव्हापासून ते मुंबईत खड्डे भरण्याचं काम कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या मदतीची आशा न ठेवता करतात. आजपर्यंत त्यांनी ५६६ खड्डे भरले आहेत.
दादाराव म्हणतात, “माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतर कोणाबरोबरही पुन्हा नको व्हायला. जोपर्यंत भारत खड्डेमुक्त होणार नाही तोपर्यंत मी खड्डे भरत राहणार.” बिल्डिंग ची कामं जिथे चालू असतात तिथल्या ठेकेदारांना उपयोगात न येणारे समान न फेकण्याची विनंती सुद्धा ते करताना दिसतात. आणि हे समान ते खड्डे भरण्यासाठी वापरतात.
मुंबईची तुंबई झाल्याची ओरड नेहमीच होते पण आपलं दुःख बाजूला सारून ते दुसऱ्याच्या वाट्याला यायला नको म्हणून स्वतः पुढे होणारे दादाराव जनसामान्य आणि प्रशासन सर्वांसमोर आदर्श घालून देतात.
तर मित्रांनो मलिष्काचा व्हिडीओ आपण व्हायरल करतो… चंद्रावरचे खड्डे म्हणून मुंबईचे खड्डे पण व्हायरल करतो. पण हे दादाराव भिल्लोरेंचे छोटेशे वाटणारे कार्य व्हायरल केले आणि त्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी आपापला खारीचा वाटा उचलला तर असे अपघाती मृत्यू आपण नक्कीच वाचवू शकतो. बरोबर ना….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.