New Year 2022 : भारतातल्या या 5 जागी तुम्ही करू शकाल हटके New year celebration.
वर्षे सरत आलं की नव्या वर्षाचं स्वागत कसं करायचं आणि जुन्याला निरोप कसा द्यायचा याचा विचार सुरु होतो.
काहीतरी वेगळी थीम, काहीतरी हटके सेलिब्रेशन करण्याचं सगळ्यांच्याच मनात असतं.
त्यासाठी आज आम्ही आपल्याला काही हटके ठिकाणं सांगणार आहोत.
जसं की टेकडीवर (डोंगरावर) न्यु इअर सेलिब्रेशन करायचं असेल तर मनाली बेस्ट ऑप्शन आहे.
शाही स्टाईल मध्ये नववर्षाचं स्वागत करण्यासाठी उदयपुर मध्ये तुम्ही जाऊ शकता.
बोट हाऊस मध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही उटीची निवड करु शकता.
मित्रांनो, कसं आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना घरात कोंडून घ्यावं लागलं होतं.
पण आता जरा मोकळा श्वास घेता येतोय, तर तुम्ही एनर्जीने उत्साहाने फिरण्यासाठी नवनवीन ठिकाणं शोधत असाल. पण अनाहूत आलेला नवीन पाहुणा, ओमीक्रॉनमुळे पुन्हा आपल्याला काळजी घेऊनच पुढे जायचे आहे, हे मात्र लक्षात असू द्या!
हे सगळे जरी असले तरी, नव्या वर्षाची चाहूल उत्साहाला द्विगुणित करते, हे तर आहेच…
तर चला आज आम्ही तुम्हांला भारतातल्या अशा 5 जागांविषयी सांगणार आहोत जिथं तुम्ही जाऊ शकाल आणि एका वेगळ्या प्रकारे नववर्षाचं स्वागत करू शकाल, त्याचबरोबर एक अविस्मरणीय अनुभव तुमच्या पोतडीत जमा होईल.
1) मनाली
नव्या वर्षाचं स्वागत भुरभुरणा-या बर्फात करायचं असेल तर सामान पँक करा आणि थेट मनालीला जा.
इथे तुम्ही फँमिलीसह जाऊ शकता, मित्रपरिवारासह जाऊ शकता, किंवा जोडीदाराबरोबर एंजॉय करू शकता.
मनालीच्या रस्त्यावर जो रोमांचकारी अनुभव तुम्ही घेऊ शकता तो भारतात इतरत्र मिळणं अवघड आहे.
मनालीच्या ब-याच हॉटेलमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित केली जाते.
2) उदयपुर
‘सिटी ऑफ लेक्स’ म्हणजे राजस्थानातली उदयपुर सिटी.
उदयपुरला जाऊन तुम्ही राजवाड्याचा रॉयल अनुभव घेऊ शकता.
उदयपुरमध्ये राजस्थानी लोक कला, नृत्य, संगीत आणि राजस्थानी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
उदयपुरच्या तलावाकाठी बसून सरत्या वर्षाला निरोप देणं हा एक स्वर्गीय अनुभव ठरू शकतो.
3) गोवा
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेलं सौंदर्य आणि भरपूर बीच यामुळे गोवा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं.
त्यात जर दोस्त मंडळी बरोबर असतील तर गोव्याचा एक निराळाच रंग दिसायला लागतो.
नाईट लाईफसाठी गोवा सुप्रसिद्ध आहे.
नव्या वर्षाचं स्वागत बेधुंद होऊन करण्यासाठी गोव्याला नेहमीच पहिली पसंती दिली जाते.
4) शिमला
डोंगराची राणी म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे सिमला सिटी.
थंडीची मजा अनुभवायची असेल तर शिमल्याला आवर्जून भेट द्या.
हिमाचल प्रदेशची राजधानी असणाऱ्या शिमल्यात बर्फाने ओसंडून वाहणारे डोंगर तुम्हांला मंत्रमुग्ध करतील.
इथला मनमोहक नजारा, निसर्ग संपन्न दरी खोरे पाहून तुम्ही थक्क व्हाल.
नवीन वर्षाचं स्वागत वेगळया पद्धतीने करण्यात शिमला अग्रेसर आहे
त्यामुळे यावर्षी तुम्ही नवं वर्षाच्या स्वागतासाठी शिमल्याची निवड करू शकता.
5) ऊटी
नवीन वर्षाचं स्वागत तर करायचं आहे पण दंगा धुडगूस नको आहे, शांततेनं नव्या वर्षाचं स्वागत करायचं आहे तर तामिळनाडू राज्यातलं उटी तुमच्या साठी उत्तम आहे.
बोट हाऊसमध्ये निवांतपणे तुम्ही सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करु शकता.
त्याचबरोबर बोटँनिकल गार्डनमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता.
सरत्या वर्षाची दुःख सारी
सोडून जाऊ वा-यावरती
नव्या वर्षाच्या स्वागता आणू
नवी स्वप्नं अन् आशा नवी
तर यावर्षी जुन्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी वेगळा अनुभव आणि हटके ठिकाण निवडा .
एका डोळ्यात आसू, एका डोळ्यात हासू घेऊन अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तयार व्हा.
यातलं कोणतं ठिकाण तुम्हांला नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आवडेल कमेंट करून आम्हांला नक्की सांगा.
येणाऱ्या नवीन वर्षाच्या मंगलमयी, आरोग्यदायी आणि समृद्ध अशा शुभेच्छा!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.