३१ मे, म्हणजेच जागतिक तं_बाखू विरोधी दिन. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण व्य_सनांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल ते पाहूया.
व्य_सन मग ते दा_रूचे असो अथवा तंबाखूचे आरोग्यासाठी अत्यंत वाईटच असते.
इतरही कोणत्याही प्रकारचे व्य_सन असो ते वाईटच.
अशा व्य_सनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी लागतो तो निश्चय.
त्यासाठी खाली दिलेले प्रयत्न करा
१. मनाशी निर्धार करा
दररोज सकाळी उठल्याबरोबर मनाशी हे पक्कं ठरवा, तशी प्रतिज्ञाच करा की मी स्वतःला सर्व प्रकारच्या व्य_सनांपासून दूर ठेवेन.
त्यासाठी व्य_सनी व्यक्तींना होणारे त्रास लक्षात घ्या. त्यांच्या स्वातंत्र्यावर येणाऱ्या मर्यादा, त्यांना समाजात मिळणारी वागणूक, त्यामुळे होणार मनस्ताप हे सगळे लक्षात घ्या, माझ्या वाट्याला मी ह्या गोष्टी येऊ देणार नाही असा निर्धार करा.
२. सकारात्मक विचार करा
सकाळी उठल्याबरोबर आध्यात्मिक, सकारात्मक विचार मनात आणा. चांगले विचार असणारी पुस्तके वाचा.
देवाची स्तोत्रे किंवा प्रार्थना म्हणा, त्यामुळे तुम्हाला जगण्याची उमेद वाटून उत्साह आणि आनंद वाढेल. व्य_सनाबद्दलचे विचार मनात येणार नाहीत.
३. चांगला छंद जोपासा
व्य_सनांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी स्वतःला एखाद्या चांगल्या कामात गुंतवून घ्या. एखादा चांगला छंद जोपासा. काहीतरी भरीव काम करण्याचा प्रयत्न करा.
त्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटून मनातील वाईट विचार दूर होतील.
४. दररोज काही मिनिटे ध्यानधारणा करा
दररोज काही मिनिटे ध्यान करण्याची स्वतःला सवय लावून घ्या. त्यामुळे आपल्याला सर्वशक्तिमान अशा परमेश्वराचे अस्तित्व लक्षात येते.
ध्यान करण्यामुळे शांतता, आत्मिक आनंद, प्रेम आणि उत्साह मिळतो. तसेच आपला आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे निग्रहाने व्य_सनांना दूर ठेवणे शक्य होते.
५. लोकांना भेटा
चांगले विचार असणाऱ्या लोकांना वारंवार भेटा, त्यामुळे आपणही चांगले विचार करू लागतो. अशा भेटींमुळे मनात वाटत असणारी व्यसनाची गरज दूर होऊन इतर गोष्टींमध्ये मन रमते.
एकमेकांच्या मतांची देवाण घेवाण होते. जीवनाला चांगले उद्दिष्ट मिळाले की व्यसनांकडे दुर्लक्ष करणे शक्य होते.
तर ह्या आहेत अशा ५ प्रतिज्ञा. ह्या प्रतिज्ञा दररोज करा आणि स्वतःला कोणत्याही प्रकारच्या व्य_सनापासून दूर ठेवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.