हे बंध रेशमाचे…
काय काय गिफ्ट मिळणार याचा आनंद, मेहंदी ची तयारी, नवीन ड्रेसची खरेदी, विशेष बनवलं गेलेल जेवण, आत्या, काका, मामा, आम्ही सर्व भाऊ बहिण सर्वांच एकञ जमणं, काेण काय काय देणार यावरून सगळ्यांनी एकमेकाला चिडवणं, घर भरवून टाकणारे हास्याचे कारंजे आणि बरंच काही….. श्रावणाचे सगळे रंग या एकाच दिवसात दिसायचे !!!