आपल्यापैकी कोणालाच रिकामं पाकिट आणि पैसे नसलेलं बॅंक अकाउंट आवडत नाही.
त्याउलट पैशाने तुडुंब भरलेलं पाकिट आणि खात्यावर मोठमोठे आकडे असलेली रक्कम पहायला आपल्याला खुप आवडतं.
माझ्याजवळ भरपुर पैसा आहे, ही भावना सुखद आहे.
जवळ असलेला पैसा माणसाला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातो.
त्याउलट तिजोरीत आणि अकाउंटमध्ये असलेला पैशाचा दुष्काळ माणसाची झोप उडवतो, त्याला अस्वस्थ करतो.
महत्वाचे निर्णय घेताना त्याच्या मनाची अवस्था चलबिचल करायला भाग पाडतो.
आयुष्यात चढ उतार येतच असतात.
पैशाची टंचाई कशी भयानक असते, जवळ पुरेसे पैसे नसले की कसे शोषण होते, याचा अनुभव आपल्या प्रत्येकाने केव्हा ना केव्हा घेतलाच असेल.
पैसे नसलेल्या व्यक्तिला मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य नसते.
पैसे नसलेल्या व्यक्तीच्या मताला समाजात किंमत नसते.
माझ्याजवळ पैसे नाहीत हे एक दुःख आणि मला हवा तो मानसन्मान मिळत नाही, हे दुसरे दुःख, अशा दुहेरी कोंडीमधुन बाहेर पडण्याची ही त्याची लढाई दररोजच सुरु असते.
जगातल्या हजारो-लाखो नौकरदारांची हीच समस्या आहे.
कित्येक वर्ष नौकरी केल्यानंतरही का त्यांच्याजवळ एकदोन महीन्याच्या खर्चापेक्षा जास्त पैसे शिल्लक नसतात?
जर तुम्हीही रिकामं पाकिट आणि दुष्काळग्रस्त बॅंक अकाउंट ह्यांनी परेशान झाला असाल,
तर पैशाने गच्च भरलेलं पाकिट आणि बॅंकेत भरघोस उत्पन्नाचा खजिना निर्माण करण्याचे काही उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे.
१) उत्पन्नाचा एकच स्त्रोत नसावा
जे लोक आर्थिक कडकी आणि पैशाची तंगी ह्या समस्यांमध्ये नेहमी गुरफटलेले असतात, त्यांचे निरीक्षण केल्यास तुम्हाला एक गोष्ट चटकन ध्यानात येईल ती म्हणजे,
पैसे मिळण्यासाठी फक्त एकाच साधनावर ते अवलंबुन आहेत.
एखादं संकट, आणीबाणीची परिस्थिती आली की अशा लोकांच्या नाकातोंडात पाणी जातं.
म्हणुन म्हणतो, नौकरीमधुन मिळणार्या पगाराव्यतिरिक्त कमाईचं अजुन एक साधन असणं, अत्यंत आवश्यक आहे.
जगप्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बुफे म्हणाले होते, एका ठिकाणाहुन आलेल्या शंभर रुपयांऐवजी शंभर ठिकाणांहुन प्रत्येकी एक रुपया आलेला कधीही चांगला!
कमाईचा एकच एक स्त्रोत असणार्या लोकांकडे महिन्याच्या सुरुवातीला पैसे येतात आणि त्यांच्याकडुन महिन्याच्या शेवटपर्यंत सगळे पैसे निघुन जातात.
बचत न केल्यास, रिकाम्या पाकिटाचा रोग जडतो, ह्यात नवल ते काय?
म्हणुन तुम्ही नौकरी करत असा वा व्यवसाय, पैशाच्या एका उत्पन्नाच्या सोअर्सवर कधीही डोळे झाकुन विश्वासुन राहु नका. दुसरे सोअर्स उभे करण्यासाठी पुढाकार घ्या.
उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधा, जसे की साईड-बिजनेस, पार्ट टाईम जॉब, गुंतवणुक, किरायाचे उत्पन्न असे काहीही मिळवण्यासाठी डोके चालवा.
२) नियमित बचतीची शिस्त नसणे.
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त अत्यावश्यक असतेच असते.
ज्यांच्या आयुष्यात आर्थिक शिस्त नसते, ज्यांचं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नसतं, त्यांच्याकडे नेहमीच पैशाचा ठणठणाट असतो.
त्याउलट भावनांची सरमिसळ न करता, वेळप्रसंगी अत्यंत कठोरपणे निर्णर घेऊन कसल्याही परिस्थितीत नियमित बचत करणार्या लोकांच्या तिजोरीत सदानकदा पैशाचा खणखणाट असतो.
जोपर्यंत एखादा व्यक्ती दरमहा बचत करण्याची सवय लावुन घेत नाही, तोपर्यंत त्याच्या आर्थिक समृद्धतेमध्ये बदल घडणं अवघड आहे.
तुमचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत जरी असले, आणि तुम्ही नियमित बचत करत नसाल तर तुम्ही शेवटी रिकाम्या पाकिटाचेच मालक रहाल.
बचत आणि गुंतवणुक न करणार्या लोकांची अवस्था ही पीठाच्या गिरणीसारखी असते, वरुन हजारो किलो धान्य टाकलं तरी ते सगळं पीठ होवुन बाहेर पडतं, ती स्वतःसाठी काहीच साठवुन ठेवु शकत नाही.
तुमचे उत्पन्न काही हजार असेल किंवा काही लाख रुपये असेल, पण नियमित बचतीची सवय नसेल तर पैसे येत राहतील, पैसे जात राहतील, हे दुष्टचक्र तोडा. अधिकाधिक बचत करा. आर्थिक टंचाईतुन बाहेर पडा.
उज्वल आर्थिक भविष्यासाठी दर महिन्याला मोठी बचत करुन, उरलेल्या पैशामध्ये आनंदाने जगण्याची सवय आपण स्वतःला लावुन घेतली पाहिजे.
३) खर्चावर नियंत्रण नसणं
जर तुम्ही अशा वस्तुंची खरेदी करता ज्यांची तुम्हाला आवश्यकता नाही, तर लवकरच तुमच्यावर अशा वस्तु विकण्याची वेळ येईल ज्यांची तुम्हाला आवश्यकता आहे.
उगीच बाजारात सेल लागला किंवा फ्लिपकार्ट एमोझॉनवर महासेल लागला म्हणुन डिस्काऊंटच्या मोहापायी आपण जर अशा वस्तुही खरेदी करत असु ज्यांची आपल्याला तितकी गरज नसेल तर ही घातक सवय आहे.
आपल्या खिशाला पडलेलं हे असं छिद्र आहे, ज्यातुन गळुन गेलेला पैसा आपल्याला समजतच नाही. हे आपल्याला गरीबीकडे घेऊन जातं.
मग खरेदी करणं सोडुन गरीबासारखं जगावं आणि कंजुष बनुन एके दिवशी मरुन जावं का? नाही!
कुठल्याही वस्तुची खरेदी करण्याआधी इच्छा आणि गरज ह्यातला फरक आपण समजुन घेतला पाहिजे.
आपले कित्येक मोठे खर्च हे गरजेपोटी नाही, केवळ भावनांच्या भरात होतात. नंतर त्या वस्तुंकडे, कपड्यांकडे आपण ढुंकुनही बघत नाही.
तुम्ही शॉपिंगच्या व्यसनाने त्रस्त असाल तर ‘टु विक फॉर्मुला’ वापरा.
समजा, तुम्ही तुमच्या फेव्हरेट ब्रॅंडच्या शुजची आकर्षक जाहिरात बघितली.
ते पाहुन तुम्हाला नवे शुज घ्यायची तीव्र इच्छा झाली, तर दोन आठवडे थांबा, तात्काळ खरेदी करु नका,
ही तात्पुरत्या भावनांची उबळ असेल तर पंधरा दिवसात ती शमुन जाईल. आकर्षण वाटेनासे होईल. सध्याचे शुज छानच आहेत, असा मनाचा कौल मिळेल.
खरोखरच गरज असेल तर मात्र जास्त विचार न करता खरेदी करुन मोकळे व्हा व पुढे पडा. मनातल्या मनात घुसमटत राहु नका.
हीच गोष्ट नवा मोबाईल, नवी गाडी, नवे कपडे, नवी साधने, मुव्ही, पार्टी, चैनीच्या गोष्टी ह्या सगळ्यांसाठी लागु पडते.
‘माझा स्वभावच खार्चिक आहे’ ‘मला सगळे ब्रॅंडेडच लागते’ ‘आयुष्य एकदाच मिळते’ ‘पैशाचा उपभोग घ्यायलाच हवा’ असे लंगडे समर्थन देऊन विनाकारण अनावश्यक गोष्टींवर खर्च करु नका, एवढेच माझे म्हणणे आहे.
४) आर्थिक नियोजनाचा अभाव
कित्येकदा असेही होते, की आपण थेंब थेंब साचवुन बचत करतो खरी, पण एखादी मेडीकल इमर्जन्सी, एखादा अपघात, एखादी दुर्दैवी घटना आपली सगळी मोठ्या कष्टाने जमवलेली बचत आणि मेहनत पाण्यात घालते.
म्हणुन आयुष्यात आर्थिक नियोजन करणे, अत्यंत आवश्यक आहे.
स्वतःचा, कुटूंबीयांचा हेल्थ इन्शुरंस, मेडीक्लेम, विमा पॉलीसी, एक्सीडेंट आणि सिरीयस आजारांवर कव्हर घेणे काळाची गरज आहे.
ज्यांच्याकडे फायनान्शिअल प्लानिंग नसतं, अशा लोकांवर वाईट वेळ आली, एखादा संकटाचा तडाखा बसला, की पर्सनल लोन, गोल्ड लोन अशा महागड्या व्याजांची कर्ज उचलण्याची आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते.
नंतर उशीराने शहाणपण सुचुन काही फायदा नसतो. आग लागल्यावर विहीर खोदुन आग विझवता येईल काय? म्हणुन आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचे आहे.
कर्ज ही आर्थिक दलदल आहे, त्यातून माणुस जितका बाहेर यायचा प्रयत्न करतो, तितका तो आत फसत जातो.
झटपट सुखसुविधा हव्या असं माननारी लोकं होम लोन, कार लोन, इएमआयवर गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, क्रेडीट कार्डने अतिखरेदी असे मार्ग वापरतात.
अशा वेळी आपला महीन्याचा इ. एम. आय. हा आपल्या पगाराच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त कधीही नसावा, अन्यथा पुढे आपल्यासाठी ती धोक्याची घंटा ठरते.
आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्ण: जो व्यक्ती सतत नेहमी, कर्जाच्या आणि व्याजाच्या ओझ्याखाली दबुन गेला असेल, तो बचत कशी काय करु शकणार?
कर्ज घ्यायची वेळ आलीच तर कमीत कमी व्याजदाराची कर्ज कशी मिळवता येतील ह्याबद्द्ल आग्रही असा.
५) आर्थिक साक्षरतेचा अभाव
आपल्या सर्वांना शाळा, कॉलेजमध्ये हव्या-नको त्या सगळ्या विषयांचे शिक्षण दिले जाते, वेगवेगळ्या विषयांचे कामाचे आणि बिनकामाचे बोजड ज्ञान आपल्या डोक्यात भरवले जाते.
पण जगण्यासाठी अत्यावश्यक असणारे आर्थिक साक्षरतेचे ज्ञान, आपल्याला शाळा कॉलेजात कधीच शिकवले जात नाही.
गरीब लोक आपल्या कमाईतुन आपले मुलभुत गरजा, आपले खर्च भागवतात.
मध्यमवर्गीय लोक आपली कमाई गरजा आणि चैनीच्या गोष्टी मिळवण्यावर खर्च करतात.
श्रीमंत लोक मात्र आपली कमाई योग्य ठिकाणी गुंतवतात आणि त्यातुन मिळालेल्या नफ्यावर आपले आयुष्य सुखाने जगतात, आयुष्याचा खराखुरा आनंद घेतात.
आपल्या सर्वांचा रिकाम्या पाकिटाचा रोग कायमचा दुर होवुन, निष्क्रिय कमाईतुन आपल्या सर्वांवर पैशाचा धो धो पाऊस पडो ह्या एकाच शुभकामनेसह 💐
मनःपुर्वक आभार!
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice, I agree with you
अतिशय प्रेरणादायी लेखन
धन्यवाद सर
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
Nice article…. 👍👌
5 khup chan pudcha lekh nervous system var ky karta yeil tyavr dya
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom