डोसा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.
उत्तम डोसा करण्यासाठी कल्पकता आणि स्वयंपाकाची आवड ही हवीच.
कारण डोशाचं नाव जरी काढलं तरी खवैय्यांची भूक खवळते, तोंडाला पाणी सुटतं.
डोश्यामध्ये असंख्य प्रकार आहेत आणि वेगवेगळी कॉम्बिनेशन सुद्धा आहेत
अस्सल खवय्यांना आवडणारे हे आहेत थोडे वेगळे, मस्त पण चवीष्ट डोसे.
1) पनीर डोसा
खूप जणांना पदार्थात पनीर वापरलेलं खूप आवडतं. पण डोश्यामध्ये पनीरचं स्टफिंग ?
खूप मस्त लागतो पनीर स्टफिंगचा ‘पनीर डोसा’.
चविष्ट तरीही अफलातून पौष्टिक असा हा पर्याय आहे.
भरपेट हेल्दी ब्रेकफास्टसाठी किंवा स्नॅक्स पार्टीमध्ये हा पनीर डोसा मजा आणतो.
प्रथिनांचं पोषणमूल्य घेऊन येणारी पनीर भुर्जी डोश्याची लज्जत अजिबात कमी होऊ देत नाही.
वरती जर मेथीची पानं हलकेच भुरभुरली असतील तर आssहाssहाs
करायला सहज सोप्पा असा हा पनीर डोसा नक्की करून बघायला हवा किंवा किमान चाखायला हवा.
कारण हा पनीर डोसा तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांवर वेगवेगळे प्रयोग करायची संधी तर देतोच त्याचबरोबर डोशाच्या अस्सल चवीची हमीही देतो.
2) शेझवान डोसा
बारीक चिरलेले बीन्स, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याची पात घालून तयार झालेला कुरकुरीत दक्षिण भारतीय डोशाचा आधुनिक अवतार म्हणजे शेझवान डोसा.
व्हेज स्प्रिंग रोलच्या मालिकेत एक स्वादिष्ट इंडो चायनीज पाककृती म्हणून शेझवान डोसा गणला जाऊ शकतो.
हा फ्यूजन डोसा मुंबईच्या फास्ट-फूड जॉइंट्समध्ये सहज मिळतो .
भारतात ब-याच ठिकाणी हा शेझवान डोसा उत्कृष्ट स्ट्रीटफूड म्हणून लोकप्रिय आहे.
शेझवान डोसा मिरची किंवा सोया सॉससोबत गरमागरम सर्व्ह केला जातो.
चिरलेल्या भाज्यांचा भूक चाळवणारा रंग आणि सॉसची चव यामुळे ही डिश खाद्यप्रेमींसाठी हटके बनते.
3) चीज डोसा
एक खुसखुशीत वेगळेपणा देणारा चीजडोसा खवैय्यांना खुश करणारा आहे.
चीजप्रेमींसाठी तर हा चीजडोसा पर्वणीच आहे.
डोशाच्या रोलमध्ये चीजसह मिरची फ्लेक्स, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांचा समावेश असेल तर अप्रतिम चवीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
रिकोटा चीज किंवा मेक्सिकन फ्रेस्को चीज मुळे चीजडोश्याची लज्जत आणखी वाढते.
4) नीर डोसा
नीर डोसा हा प्रकार कदाचित तुम्ही चाखला नसेल पण ऐकला असेल.
नीर म्हणजे पाणी.
पाण्याइतकं पातळ या डोशाचं पीठ असतं.
मऊसुत असा हा नीरडोसा जीभेवर विरघळतो.
पाचसहा नीरडोसे तुम्ही एकावेळी सहज फस्त करु शकता.
नीर डोसा हा पचायला खूपच हलका असतो.
नारळाची चटणी किंवा गोड दुधाबरोबर याचा आस्वाद घेतला जातो.
नीर डोसामध्येही काही शाकाहारी वैविध्य आणता येतं.
पालक, नाचणी, बीट, जिरे, धणे आणि सुक्या लाल मिरच्यांचा मसाला हे पिठात मिसळून नीर डोशाचा स्वाद चाखता येतो.
अस्सल खवैय्ये डोसाप्रेमी डोश्यांचे हे प्रकार शोधून काढतीलच पण प्रत्येकानेच आयुष्यात एकदा तरी असे हे वेगळ्या चवीचे डोसे चाखायला काहीच हरकत नाही. नाही का ?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.