सरकारच्या नव्या धोरणानुसार आता RTO संबंधी काही काम असल्यास ते घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करता येऊ शकेल.
मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज च्या अधिसूचनेनुसार RTO च्या सूचना डिजिटल केल्या गेल्या आहेत.
Certain services regarding Driving License and Certificate of Registration have been made completely online. Now these services can be availed without going to RTO. With Aadhaar authentication, on voluntary basis, anyone can get the benefit of these contactless services. pic.twitter.com/UBBvbbsGfG
— MORTHINDIA (@MORTHIndia) March 4, 2021
त्यासाठी केवळ आधार क्रमांक RTO च्या कागदपत्रांशी जोडलेला असला पाहिजे.
वरती दाखवलेल्या ट्विट मध्ये मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज ची ही अधिसूचना बघता येईल.
त्यामुळे गर्दी टाळून फारसा वेळ न घालवता ही कामे करता येऊ शकतात.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे RTO संबंधित अठरा कामे आता डिजिटल स्वरुपात करता येऊ शकतात.
त्यासाठीची माहिती विविध माध्यमातून नागरिकांना देण्यात येईल.
त्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी की ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे आर सी आधार क्रमांकाशी जोडलेले असले पाहिजे.
आधार क्रमांक वेरिफिकेशन झाल्यावर अशा सुविधा नागरिकांना वापरता येऊ शकतात.
त्यामुळे वेळेची बचत तर होईलच शिवाय RTO मध्ये होणारी गर्दी नियंत्रणात ठेवता येते.
तर रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार ऑनलाइन पद्धतीने जवळपास अठरा सुविधा नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करणे (ज्यासाठी ड्रायव्हिंग टेस्टची आवश्यकता नसते), डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आर सी वरील पत्ता बदल करणे, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परवाना घेणे अशा काही सुविधांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या घेता येऊ शकतो.
याशिवाय डुप्लिकेट आर सी मिळण्यासाठी विनंती अर्ज, एन ओ सी मिळण्यासाठी विनंती अर्ज, गाडी विकली असेल तर खरेदी कर्त्याच्या नावावर करण्यासाठी सूचना, मान्यताप्राप्त चालक प्रशिक्षण केंद्रातून चालक प्रशिक्षण नोंदणीसाठी अर्ज अशी महत्त्वाची कामं सहजपणे ऑनलाइन पद्धतीने करता येतील.
अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी parivahan.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल..
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने जरी अशी माहिती दिलेली असली तरी प्रत्यक्ष अनुभव घेतला असताना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी सुरवातीच्या काही स्टेप्स करून पुढील कामासाठी RTO मध्ये प्रत्यक्षपणे जावेच लागते.
भारतात सरकारी यंत्रणांनी सरकारी कामे सोपी केल्याची नुसती जाहीर वाच्यताच न करता प्रत्यक्षपणे तसे केले तर सरकारी कार्यालयांत अनावश्यक गर्दी कमी होण्याबरोबरच इतरही अनेक फायदे होऊ शकतील.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.