आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग २

आर्थिक ज्ञानमोती (Pearls of financial wisdom) भाग १

  • वैयक्तिक गुंतवणूकदार योग्य मार्गाने गुंतवणूक करीत असल्याची एक मोठी खूणगाठ म्हणजे त्याचा गुंतवणूक संच स्थिर अथवा कमी बदलता असतो.
    One best sign of progress in individual investor’s portfolio is no churn or very less churn.
  • झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपल्याकडे असेल नसेल ते घालवण्यासाठीची खात्रीची योजनाच.
    Trying to get rich fast is a foolproof way to lose what we have.
  • पैसे वाया घालवण्यापेक्षा एखादी गुंतवणूक योजना अथवा संधी वाया घालवणे कधीही चांगलेच. घाईगडबडीत अविचाराने गुंतवणूक करू नये. संधी वारंवार येत असते.
    Loosing an investing deal or opportunity is far better than losing money. Opportunity always comes. Don’t invest in haste & hurry !!
  • शक्य तेवढया झटपट पैसे मिळवणे हा गुंतवणूक मार्ग नाही परंतू दुर्दैवाने बहुतेक अनेकजण या मोहाला बळी पडतात.
    Making as much money as quickly as possible is not an investment strategy. Unfortunately, for most of us that is the strategy.
  • अधिक बचत करणे यास आक्रमकवृत्तीने बचत करणे हा पर्याय होऊ शकत नाही. जास्तीत जास्त गुंतवणूक करून थोडा धोका स्वीकारणे हे कमी गुंतवणूक करून जास्त धोका स्वीकारण्यापेक्षा केव्हाही चांगलेच. यशस्वी होण्यासाठी, खर्चावर नियंत्रण ठेवून अधिक गुंतवणूक करणे हे सूत्र लक्षात ठेवावे.
    Aggressive strategy cannot be a substitute for high savings.
    Save high and take moderate risk: than saving less and taking high risk. Spending less or saving more is d guaranteed formulae for “Confirmed Success”.
  • हातचे सोडून पाळत्याच्या मागे धावू नका , फायद्यापेक्षा आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेणे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे.
    The day we realise that “not losing” is as important as “winning”; we would stop blindly chasing returns.
  • प्रतिकूल काळापेक्षा अनुकूल काळ अधिक असतो जरी आपण प्रतिकूल परिस्थितीत असाल तरी कोणतीही छोटी चांगली संधी गमावू नका.
    Good periods are more than bad periods. By not timing, though we go through bad periods, do not miss even a single good period.
  • झटपट फायदा मिळवण्यासाठी शक्ती वाया घालवण्यापेक्षा शेअर्समधील गुंतवणूक पूर्णपणे व्यावसायिकतेने केली तर संपत्तीत वाढ होईल.
    We’ll stop looking for quick money the moment we consider stocks as businesses and realise that our wealth grows in line with business growth.
  • अधिकाधिक फायदा, कमी फायदा, शून्य फायदा आणि तोटा हे गुंतवणूकचक्र आहे. दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी याचा अनुभव घ्यावाच लागतो.
    There are 4 phases of investment cycle: High Returns, Low Returns, No Returns, Negative Returns. We need to essentially go through all these phases to get good Long Term Returns.
  • अनेकांनी व्यक्त केलेले बाजाराचे अंदाज आणि दररोज समभाग निवडीचे सल्ले ऐकून केलेली गुंतवणूक बहुतेकदा ही धोकादायक ठरते.
    Listening to many ‘market forecasts’ & daily dosage of ‘stock selection advice’ is not only useless but can be very harmful too; if you start acting on them.
  • एवढ्या प्रचंड लोकसंख्येतील केवळ 3% भारतीय लोक गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय स्वतः घेऊन आर्थिक स्वावलंभानाचा अनुभव घेत आहेत. हे कटू असले तरी सत्य आहे तेव्हा सजग राहून, अधिक जबाबदारीने वागून, जागृत होऊन गुंतवणुकींच्या संधीचे सोने करा.
    The hard truth is only around 3% of our Indian population are in a position to aspire for making own investment decisions to achieve financial independence! So, don’t waste this rare privilege bestowed upon you! Be wise & act with maturity!.

यातील काही वचनांबद्धल मतभिन्नता असू शकते, परंतू सर्वसाधारण एकमत होईल यात शंका नाही म्हणून हा सर्व खटाटोप.

(संपूर्ण)

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।