प्रवास करायला कुणाला आवडत नाही ? विशेषतः बोअरींग रुटीन नंतर मनसोक्त प्रवास करायला मिळाला आणि तो ही आपल्या बजेटमध्ये तर सोने पे सुहागाच!
व्यक्ती तितक्या प्रकृती हे प्रवासाच्या बाबतीत ही खरं असतं.
म्हणजे बघा, काही जण बचत करुन ठराविक वेळाने ट्रीप प्लॅन करतात. जसं वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून ट्रीप अरेंज करतात.
मस्त आलीशान रिसॉर्टमध्ये राहतात.
काहीजण प्रवास आरामदायी निवडतात आणि राहण्याच्या ठिकाणी पैसे वाचवतात. आलिशान ठिकाणाऐवजी साधंचं वसतिगृह निवडतात.
काही जण छोट्या छोट्या गोष्टीचं बजेट असं ठरवतात की त्यांना पुन्हा पुन्हा प्रवास करणं शक्य असतं.
तर मनसोक्त प्रवासाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही पण या पाच मुलभूत गोष्टींचा एकदा नक्की विचार करा.
1) उत्तम ऑफर्सचा शोध घ्या.
प्रवासाची संकल्पना आता सगळीकडे चांगली रूजली आहे.
त्यामुळं रेल्वे, विमान आणि बससेवेमध्ये काही चांगल्या ऑफर्स आपल्याला बघायला मिळतात.
अर्थात यासाठी प्रवासाचं नियोजन जरा लवकर करावं लागतं.
प्रवास सुखकर होण्यासाठी प्रवासी कंपनी आणि एजंट कडून सुट्टीच्या आधी सवलती जाहीर होत असतात.
त्यांच्यावर लक्ष ठेवून, तुलना करून लवकरात लवकर बुकिंग करून आपण, आपला बजेटमधला प्रवास करू शकतो.
2) जेवण स्वतःच तयार करा.
प्रवासाला बाहेर पडल्यानंतर जेवण तयार करायचं तर डाळ तांदूळ असं सगळं सामान कॅरी करायला लागेल.
आधीच प्रवास, मग साईट सिईंग त्यात पुन्हा स्वयंपाक नको रे बाबा ! असंच तुम्हाला ही वाटत असेल.
पण आधुनिक जगात अशा अनेक गोष्टी आता सहज सोप्या झाल्या आहेत.
एखादं अपार्टमेंट जिथं तुम्ही ऑनलाइन बुकिंग करून तिथलं किचन वापरून मोजके पदार्थ करू शकता आणि पैसे ही वाचवू शकता. Air BNB वर असे किचन सहित घरं तुम्हाला ऑनलाइन बुक करता येतील.
3) काउच सर्फिंग
ही संकल्पना परदेशात जास्त रूळलेली आहे.
अगदी मुलभूत सुविधा म्हणजे झोपण्यासाठी फ्री मध्ये जागा उपलब्ध करुन दिली जाते.
काही उपक्रम ही असे असतात ज्यात वेगवेगळ्या अभ्यासासाठी थोडे दिवस एखाद्या फँमिलीमध्ये सोय केली जाते.
भारतात काही शैक्षणिक सस्थांनीही वेगवेगळ्या राज्यात असे उपक्रम राबवले आहेत.
त्यांची माहिती घेऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करु शकतो.
4) प्रवासात छोटा जॉब करा.
प्रवास करता करता खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी गरजेनुसार छोटा मोठा तात्पुरता जॉब करायला काहीच हरकत नाही. वल्ड टूर करण्याचं स्वप्नं बाळगणाऱ्यांनी हा विचार करायला काहीहीहर्कत नाही. तुम्हांला इतिहासाची आवड असेल तर गाईड म्हणून काम करत प्रवास करू शकता.
भाषेवर प्रभुत्व असेल तर दुभाषी म्हणून सेवा देत प्रवास करू शकाल.
एखाद्या ठिकाणी काही दिवसांचा पार्ट टाइम जॉब करत आसपासची ठिकाणं पाहू शकाल.
क्रुझवर एखादा जॉब, पुरातत्व विभागात व्हॉलेंटिअर म्हणून काम करत तुमची ट्रीप एंजॉय करू शकता.
कष्टाला न लाजता छोट्या छोट्या गोष्टीतून कमाई करत तुम्ही एखाद्या अशक्य वाटणा-या ट्रीपचं प्लॅनिंग नक्की करू शकता.
5) डिस्काउंट कार्डस
तुमच्या वयानुसार तुम्ही डिस्काउंट मिळवू शकता.
स्टुडंट असाल तर डिस्काऊंट कार्ड, जेष्ठ नागरिक असाल त्यासाठी स्पेशल डिस्काऊंट कार्डस, कपलसाठी वेगळी कार्डस मार्केटमध्ये उपलब्ध असतात.
ट्रव्हल कंपनी, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा खरेदीसाठी असणारी व्हाउचर, फुड व्हाउचर यातून ही तुमचा ट्रीपचा खर्च मर्यादित राहू शकतो.
ट्रेकिंग, बंजी जंपिंग, हायकिंग किंवा स्कीइंग सारख्या साहसी गोष्टींचा ट्रीपमध्ये विचार करत असाल तर तुम्हांला यावर ही डिस्काउंट स्कीम मिळू शकते.
गृप असेल किंवा सोलो ट्रीप, डोळे झाकून त्या ट्रीपचं नियोजन न करता, मार्केटमध्ये उपलब्ध अनेक पर्यायांपैकी आपल्या सोयीचे पर्याय निवडा आणि आपल्या बजेटमध्ये आपली ट्रीप एंजॉय करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.