सायंकाळच्या वेळी मी मोबाईलवर एक कथा वाचत असताना व्हाट्स ऍपवरचा मेसेज स्क्रीन वर झळकला. ऐन कथा रंगात आलेली असताना दोनदा मेसेज आला. पहिल्यांदा मी इग्नोर केला आणि दुसऱ्या वेळी जो मेसेज आला तो पाहून मी कथा अर्ध्यवार सोडून त्या मेसेजला रिप्लाय केला. तो मेसेज असा काही होता कि रहस्यमय कथा वाचत असताना सुद्धा मला हसू फुटले. तो मेसेज होता माझ्या मैत्रिणीचा तिने त्या मेसेज मध्ये म्हंटले
“काही तरी बरं आण गं खायला!!”🙄
तो वाचून मी हसले आणि तिला ईमोजी द्वारे माझी reaction कळविली. त्या क्षणी माझ्या मनातले ओठावर आले. पण मी काढता पाय घेतला आणि पुन्हा माझ्या कथेत रमले.
कथा संपली आणि मग मी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मनात केव्हाच चालू होते तिच्या त्या मेसेज वर उत्तर दयावे. पण म्हंटले आरामातच दयावे. म्हणून सगळं आवरून झाल्यावर फोन हातात घेऊन तिला खडसावलेच.
मग तिच्या त्या “काही तरी बरं आण गं खायला!!” ह्या वर मी म्हंटले काय गं??? आता पर्यंत इतके भारी मेनू बनविले मी. जे मी कधीच केले नव्हते ते फक्त आपल्या प्ले डेट (Play Date) साठीच केले. त्या सगळ्यवार पाणी फिरविलेस तू. 😞😞😞(Play Date म्हणजे आम्ही ३ मैत्रिणी मिळून आमच्या मुलींना घेऊन एकीच्या घरी जमतो आणि दिवस भर एकमेकींच्या हातचे केलेले खमंग मेनू चे आस्वाद घेत छान वेळ घालवितो.) उद्या प्ले डेट करायचे आमचे ठरले आणि त्या प्रमाणे सगळ्यांनी मेनू हि declare केले. मला सुचतच नव्हतं म्हणून मी मेनू सांगितलंच नाही. ह्या दोघानीं वाट बघितली जवळ जवळ एक दिवस वाट बघितली. शेवटी एकिने विचारलं तू काय आणणार आहेस गं प्रगती?? असे सुचले नाही कि ह्या दोघी त्यांच्या फर्माईश सोडतात आणि त्या अवघड वाटतात मला. मग मी मेसेज केला….
surprise!!! surprise!!! एवढ्यावर वेळ मारून दिली
मग एकीने एक दिवस आधीच मेसेज करून सांगितलं. “काही तरी बरं आण गं खायला”🙄
मागच्या प्ले डेटला त्या पोटॅटो वेजेस चा प्रयोग काय फसला… ते हे ऐकविते आता?
तुम्हाला सांगते मागच्या वेळी काहीतरी नवीन करायचं म्हणून ते पोटॅटो वेजेस करून बघितले. आता म्हंटलं गरम गरमच करावे म्हणून मैत्रीण घरी आली आणि मग करायला सुरवात केली. बऱ्याच दिवसांनी मैत्रीण घरी आल्यावर गप्पाच्या ओघात ते पोटॅटो वेजेस half कूक च्या ऐवजी over कूक झाले. मग कसलं काय?? बोंबलले ते पोटॅटो वेजेस. त्या बिघडलेल्या पोटॅटो वेजेस कडे बघून माझा जीव पाणी पाणी होत होता. डोळे पाण्याने डब डबायचेच बाकी होते. केवढे पोटॅटो वाया गेले… ते हाल्फ कूक झाल्यावर त्या पोटॅटो च्या स्लाईसेसला कॉर्न फ्लोअर आणि ऑइल लावून bake करायचे होते. आता हे ओव्हर कूक झाल्यावर कसले हातात येत होते!!!
तरी पोटॅटोच्या स्लाईसेसला कसं बस bake केलं. बघून भयानकच वाटत होत. तरी खाल्ला बिचारी ने.. खरंतर ती खूप आशेने आली होती. कि, मस्त काहीतरी करून खाऊ घालेन मी तिला. पण प्रयोग फसल्याचा तिने जरा ऐकविले नाही. मधल्या मध्ये माझंही मन खट्टू झाले…
कारणही असेच होते. कधी नव्हे तिने मस्त मेनू आणला होता. तो म्हणजे ढोकळा चाट आणि इतका छान झाला होता तो. आता ह्या वेळी माझ्या मनाची व्यथा कशी मांडू अगदी अभ्यास करून सुद्धा परीक्षेत काहीच लिहिता न आल्या सारखी झाली होती.
मागच्या प्ले डेट ला त्या पोटॅटो वेजेस चा प्रयोग काय फसला तर हे ऐकविते होय? हे चुकीचं आहे 😟😕😭
“हे चुकीचं आहे” असे मी तिला म्हंटले. अगदीच फुल्ल कॉन्फिडन्स मध्ये.. उद्या काय करू हि अपेक्षा आहे तुझी?? असे तिला विचारलं.
त्यावरचा तिचा रिप्लाय….
दोनदा तर तू मला पोहेच खाऊ घातले आहेत…. त्यात हि एकदा काय तर बिना कांद्याचे???
तिचा मेसेज वाचून लाजेने चूर झाले. शिवाय तिला आता किती घाईत atlest पोहे तरी केले, हे सांगणं पटत नव्हतं आणि ऐकून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं😏😏.
तरी हि मी म्हंटलं… म्हंटलं “व्वा!! आजपर्यंत जे काय भारी मेनू झाले त्याचे नावच नाही…. माझा नेहमीच हाच प्रयत्न असतो कि समोरचा खाऊन खुश होईल असंच काहीतरी करायचं. पण ते कधी कधीच होतं त्याला मी तरी काय करू?
मग काय ह्यवार उत्तर म्हणून ती म्हंटली कि “हुमम!!! मग उद्या खुश करा आम्हाला चालेल आम्हाला…”
आता काय करू उद्या अजून सुचले नाही…. सगळे यु ट्यूब वरचे पंचपक्वान्नाचे चे व्हिडिओ पालथे घातले…
खाली आता पर्यंत केलेल्या खमंग मेनू चे फोटो😛😛
वाचण्यासारखे आणखी काही….
मिसळ पाव घरच्या घरी
वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.