ऐका पोह्याची रंजक कहाणी, जाणून घ्या पोहे महाराष्ट्राबाहेर इंदोरची ओळख कसे बनले?
दही पोहे, चिवडा, दडपे पोहे, शेव पोहे, मेतकूट पोहे, कांदे पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे किंवा साधं दूध साखर घालून खायचे पोहे!
पोहे हा असा पदार्थ आहे की, तो न आवडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही.
महाराष्ट्रात तर पोह्याचे इतके प्रकार घरोघरी केले जातात, की गणतीच होऊ शकत नाही.
प्रत्येकाची आवड वेगळी, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पोहे तयार केले जातात.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात पोहे, जिलेबी किंवा पोहे आणि चहाने करतात.
पश्चिम बंगालमधील काही घरांमध्ये पोह्यांपासून ‘खापोरमोंडा’ नावाचा एक गोड पदार्थही तयार केला जातो.
पोह्याचे कटलेट्स ही लोकप्रिय आहेत.
भारतात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक घरात पोहे सापडतातच.
डाळ, तांदूळ, चपाती /भाकरी नंतर पोहे हेच बहुधा आपल्या भारतीयांचा मुख्य खाद्यपदार्थ ठरतो.
इंदूर, मध्य प्रदेशचे पोहे हे त्यांची खास ओळख” बनले आहेत.
इंदूरला गेल्यानंतर, जर तुम्ही इंदोरी शेव पोह्यांचा आस्वाद घेतला नसेल, तर तुमचं इंदूरला जाणं पूर्णपणे व्यर्थ आहे!
इंदूर, शहर देशात फक्त दोन कारणांसाठी ओळखले जाते – एक म्हणजे स्वच्छता आणि दुसरं म्हणजे पोहे.
पोहे तर सगळीकडेच मिळतात, तरी इंदोरी पोह्यांच्या चवीचा नादच करायचा नाही.
पोहे मध्य प्रदेशातल्या इंदूरची ओळख कशी बनले?
नाश्त्यात पोहे, जिलेबी आणि चहा मिळाला, तर दिवसभरातील अर्धे प्रश्न संपले असेच वाटेल!
एका मान्यतेनुसार पोहे ही महाराष्ट्राने जगाला दिलेली भेट आहे.
होळकर आणि सिंधिया राजांमध्ये पोहे खूप लोकप्रिय झाले.
जेव्हा होळकर आणि सिंधिया घराणे मध्य प्रदेशात पोहोचले तेव्हा त्यांच्यासह पोहेसुद्धा इंदूर आणि मध्यप्रदेशातल्या बाकीच्या शहरांतल्या घराघरात कायमचे स्थिरावले.
पोह्यात कांदे, टोमॅटो, यांचा मुक्त हस्ताने वापर होतो.
इंदूर किंवा मध्य प्रदेशात मात्र ते कांदा-लसणशिवाय तयार केले जातात.
मध्य प्रदेशातील पोह्यांमध्ये नेहमीच चटपटीत तिखट असतं.
परदेशी लोकांमध्येही पोहे लोकप्रिय ठरले.
१८४६ सालातल्या एका लेखात असा उल्लेख आहे की, गॅरिसनने असा आदेश काढला होता की जेंव्हा जेंव्हा सैनिक सागरी प्रवासाला जातील तेंव्हा त्यांना पोहे खायला दिले जातील.
१८७८ च्या एका लेखात म्हटलं आहे की, सायप्रसमधून भारतात परतणारे काही सैनिक पोह्याच्या मागणीवर ठाम होते आणि त्यांना पोहे पुरवण्यात आले, ही आहे पोह्याची ताकद!
प्रवासासाठी पोहे उत्तम पर्याय ठरतात. सैनिक ते सहज खाऊ शकत होते.
आज ही आपण पहातो नैसर्गिक आपत्तीच्या काळात पोहे हे कोणत्याही दैवी वरदानापेक्षा कमी वाटत नाही.
१९६९ मध्ये, भारत सरकारने या पोह्यांच्या उत्पादनावर मर्यादा आणली होती कारण त्यावर्षी तांदळाचं उत्पन्न कमी झालं होतं.
पुराणातही आहे पोह्यांचे उल्लेख!
गरीब सुदामा त्याच्या श्रीमंत मित्राला कृष्णाला भेटायला गेला होता तेव्हा त्याने बरोबर काय घेतले होते? पोहे!
श्रीकृष्णाने ही हे पोहे आवडीने खाल्ले होते.
अशी ही पोह्याची सुरस चविष्ट कथा. या पोह्याच्या नुसत्या उल्लेखानं ही भूक लागते!
तर तुम्हांला कशा प्रकारचे पोहे खायला आवडतात? तुमची पोह्यांचे स्पेशल रेसिपी असेल तर आमच्या बरोबर शेअर करायला विसरू नका!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.