तुम्ही पोहे प्रेमी आहात का? या पोह्यांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश केलात तर मिळतील हे आश्चर्यकारक 6 फायदे
पोहे हा महाराष्ट्रीयन आणि कर्नाटकी आहारातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे.
कांदे पोहे, दडपे पोहे, दही पोहे, दूध पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे, पोह्यांचा चिवडा, नुसते लावलेले पोहे असे किती तरी प्रकार पोह्यांपासून खवैय्यै तयार करतात.
कांदे पोह्यांचा कार्यक्रम आता जरी कमी झाला असला तरी या पोह्यांना एक भावनिक मूल्य होतं.
प्रत्येकाला पोह्यांची एक विशिष्ट चव आवडते.
पण उत्तम चवीबरोबर पोह्याचे आरोग्यासाठी ही बरेच फायदे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?
ओटचे जाडंभरडे पीठ आणि अंडी हे वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी नाश्त्याचा मुख्य पर्याय आहे. आहेत ना?
आरोग्य आणि चव यांच्यातील परिपूर्ण संतुलन साधणाऱ्या आपल्या खाद्यपदार्थांचा रोजच्या आहारात कसा समावेश करायचा ? हा प्रश्न तुमच्या समोर आहे का ?
तर त्यासाठी तुम्ही डोळे झाकून पोह्यांची निवड करू शकता.
निःसंशयपणे, पोहे हा पौष्टिक नाश्ता आहे जो चवीष्ट सुध्दा आहे.
पोह्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ग्लूटेन-मुक्त आणि शिवाय कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत पोह्यात आहे.
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पोह्यांचे गुणधर्म आवर्जून समजून घ्यायला हवेत.
पोहे खाण्याचे ६ फायदे
१) पोहे पचायला सोपे असतात त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य नियंत्रित रहाते.
पोहे हा एक हलका नाश्ता आहे, जो पचन प्रक्रिया सोपी करतो.
पोहे पचायला हलके असतात आणि जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटतं.
आहारतज्ञांच्या मते तुम्ही अतिरीक्त चरबी कमी करुन, आम्लपित्त ही टाळायचा विचार करत असाल तर पोहे हा पौष्टिक आणि योग्य नाश्ता आहे.
तुम्हाला माहिती आहे का की पोह्यात उत्तम प्रोबायोटिक म्हणजे मानवी शरीराला लाभदायक सूक्ष्मजीव आहे.
भात आधी, शिजवून नंतर उन्हात वाळवून भट्टीत पोहे तयार केले जातात.
पोहे करण्यासाठी ते फेटले जातात आणि त्यावर केल्या जाणाऱ्या किण्वन प्रक्रियेमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारून पचलेल्या कर्बोदकांमधे आणि प्रथिनांपासून सूक्ष्मजीव वनस्पती टिकवून ठेवतात.
२) पोह्यामध्ये निरोगी कर्बोदके असल्याने ते ऊर्जा देतात
पोह्यात निरोगी कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण चांगल असतं ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते
साधारण 76.9% कर्बोदकं आणि सुमारे 23% चरबीने भरलेले असे हे पोहे आहेत.
अगदी खरंय! त्यामुळे, नाश्त्यात पोहे खाल्ल्याने तुम्हाला सक्रिय वाटेल, ते ही कोणताही चरबीचा साठा न होता.
३) रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते
पोह्यात भरपूर फायबर असते आणि ते तुमच्या रक्तप्रवाहात साखर सोडण्यावर नियंत्रण ठेवतं
पोहे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढायला ही प्रतिबंध करते.
ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा पोहे उपयुक्त आहे.
४) अशक्तपणावर मात करायला पोह्यातील लोहाची मदत होते.
तुमच्या breakfast मध्ये पोहे असतात ना?नसल्यास, लगेच समावेश करा!
त्यानंतर आमचे आभार मानायला ही विसरू नका!
कारण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पोहे लोहाची कमतरता दूर करायला मदत करतात. त्यामुळे ऍनिमियाचा धोका कमी होतो.
पोहे हा पदार्थ गर्भवती महिला आणि अगदी लहान मुलांसाठीही फायदेशीर आहे.
लोहाचे चांगले शोषण होण्यासाठी तुम्हांला पोह्यावर मस्तपैकी लिंबाचा रस पिळून ते खावे लागतील.
म्हणूनच आपल्याकडे कांदेपोह्यात लिंबू पिळला जातो किंवा पोह्यांबरोबर लिंबाची फोड दिली जाते.
५) वजन कमी करण्यासाठी पोहे उत्तम पर्याय आहे, कारण त्यात ग्लूटेन कमी आहे.
तुम्ही ग्लूटेनविषयी संवेदनशील आहात? काय खावे आणि काय टाळावे याची काळजी वाटते?
मग, तुम्हाला हे माहीती असायलाच हवं की पोह्यात ग्लूटेनचे प्रमाण कमी असते आणि ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने खाऊ शकता.
“ज्यांना जास्त वजन कमी करायचे आहे आणि निरोगी राहायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे,” असं ही आहार तज्ञांचं मत आहे.
६) पोहे तुमच्या मेंदूला बूस्टर आहे
आपटलेल्या तांदळात व्हिटॅमिन ‘बी’ भरपूर असते, जे तुम्हाला उत्साही रहायला आणि मेंदूचे आरोग्य सुधारायल मदत करू शकते.
तुला माहीत आहे का? एका वाडग्यात शिजवलेल्या पोह्यांमध्ये सुमारे 250 कॅलरीज असतात
भाज्या घालल्यामुळे जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्सचा समावेश होतो, पोषणमूल्य वाढतं.
जर तुम्ही स्थुलपणाशी लढू इच्छित असाल तर पोह्यात शेंगदाणे आणि बटाटे टाकू नका, कारण ते कॅलरीजची संख्या वाढवू शकतात.
निरोपापुर्वी …
पण पोह्याचा समावेश फक्त नाश्त्यातच करावा का?
तर याचं उत्तर हो असच आहे
पोहे पोटासाठी हलके असतात तरीही ते एक परिपूर्ण नाश्ताची उत्तम डिश आहेत.
फक्त लक्षात ठेवा, ते चांगल्या ऑइलमध्येच शिजवा.
दिवसाची सुरवात करताना तुम्ही पोह्यात खोवलेला नारळ आणि कांदा ही घालू शकता.
आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. पोह्यात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ठराविक प्रमाणापेक्षा जास्त पोहे खाल्ले तर वजन वाढू शकतं.
पोह्याचा पदार्थ करताना तो तेलकट होणार नाही याची काळजी घ्या आणि बटाटे घालणे टाळा.
ज्यांना पोहे आवडतात त्यांनी आवर्जून पोह्यांचे फायदे इतरांना ही सांगा.
कमी तेलातली पोह्यांची रेसिपी जी तुम्हांला आवडते ती आमच्या सोबत नक्की शेअर करा.!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.