या सरकारी योजनेत केवळ १५०० रुपये गुंतवून मिळतील ३५ लाख रुपये. जाणून घ्या या फायदेशीर स्कीम बद्दलची संपूर्ण माहिती. त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या योजनेच्या शोधात आहात का? तुम्हाला अशी योजना हवी आहे का जिथे कमीत कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकेल? तुम्ही अशा योजनेच्या शोधात आहात का जिथे तुमचे मुद्दल बुडण्याचा काही धोका नसेल? तुम्ही गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहून शिवाय उत्तम परतावा देणारी योजना तुम्ही शोधत आहात का? असे असेल तर हा लेख तुमच्या नक्कीच फायद्याचा आहे.
सहसा असे आढळून येते की जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये जोखीम देखील जास्त असते. जितका अधिक परतावा तितकी योजनेची जोखीम जास्त आणि अर्थातच आपण गुंतवलेली रक्कम कमी सुरक्षित. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा योजने बद्दल सांगणार आहोत जिथे तुमची गुंतवणूक सुरक्षित तर राहीलच, शिवाय कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त परतावा देखील मिळेल. ही योजना भारतीय पोस्ट खात्याद्वारे आणली गेलेली ‘ग्राम सुरक्षा योजना‘ आहे. चला तर मग या योजने बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया
ग्राम सुरक्षा योजना ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या ८० वर्षे वयाला किंवा गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नॉमिनीला गुंतवलेली रक्कम अधिक बोनस अशी उत्तम रक्कम मिळू शकते.
ग्राम सुरक्षा योजना नक्की कशी आहे?
१९ ते ५५ वर्षे वयाची कोणतीही भारतीय व्यक्ती ही आयुर्विमा योजना घेऊ शकते. सदर योजनेमध्ये कमीत कमी रु. १०००० ते जास्तीत जास्त रु. १० लाख इतकी गुंतवणूक करता येते. या योजनेचा प्रीमियम भरताना तो दर महा, दर तीन महिन्यांनी, दर सहा महिन्यांनी ( म्हणजेच वर्षातून दोनदा) किंवा दरवर्षी एकदा अशा पद्धतीने भरता येतो. प्रीमियमची रक्कम गुंतवणूकदाराच्या वयावर अवलंबून असते. जितक्या लहान वयात गुंतवणूक करू तितकी प्रीमियमची रक्कम कमी असते. वयानुसार ती वाढत जाते. प्रीमियमचा भरणा करण्यासाठी गुंतवणूकदाराला तीस दिवसांची मुदत दिली जाते. एखादेवेळी प्रीमियम भरायचा राहिला तरीही काही अटी मान्य करून पॉलिसी कंटिन्यू करण्यासाठी ग्राहकाला मुभा दिली जाते.
ग्राम सुरक्षा योजना कशी काम करते?
जर एखाद्या १९ वर्षे वयाच्या व्यक्तीने १० लाख रुपयांची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर त्या व्यक्ती वयाच्या ५५ वर्षापर्यंत दरमहा फक्त १५१५ रुपये इतका प्रीमियम भरावा लागेल. ५५ ते ५८ वर्षापर्यंत १४६३ रुपये तर पुढे वयाच्या ६० वर्षापर्यंत १४११ रुपये इतका प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला ५५ वर्षासाठी ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षासाठी ३३.४० लाख रुपये एवढा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. सदर व्यक्तीला ६० वर्षे व यासाठी ३४.६० लाख रुपये इतका मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. याचाच अर्थ केवळ १५१५ रुपये इतका प्रीमियम दरमहा भरल्यास जवळ जवळ ३५ लाख रुपये इतके पैसे मिळू शकतात.
ग्राम सुरक्षा योजनेची संपूर्ण माहिती कुठे मिळेल?
भारतीय पोस्ट ऑफिसने आणलेली ही योजना असल्यामुळे या योजनेची संपूर्ण माहिती आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये मिळू शकेल. त्याशिवाय ग्राहकांना दिलेल्या टोल फ्री नंबर १८००१८०५२३२/ १५५२३२ वर फोन केल्यास संपूर्ण माहिती मिळू शकेल. तसेच पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर देखील संपूर्ण माहिती मिळेल. www.postallifeinsuarance.gov.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळू शकेल.
तर मित्र मैत्रिणींनो भारतीय पोस्ट खात्याने आणलेल्या या सुरक्षित योजनेचा जरूर लाभ घ्या आणि कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त पैसे कमावण्याची संधी साधा. या योजनेची माहिती आपल्या मित्र व नातेवाईक मंडळींना कळण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. अशा कोणकोणत्या योजनांबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.