साधे पेट्रोल आणि पॉवर/स्पीड पेट्रोलच्या नावाखाली पेट्रोलपंपावर कशी फसवणूक होते

लेखाचं शीर्षक वाचून चकित झालात ना? होय, हे खरं आहे आपल्या नकळत पेट्रोल पंप चालक आणि तेथील कर्मचारी आपली फसवणूक करत असतात. कसे ते आपण आज जाणून घेणार आहोत.

पेट्रोलचे दोन प्रकार असतात. साधं पेट्रोल किंवा स्पीड, पॉवर, एक्स्ट्रा माईल, ह्या नावांनी ओळखले जाणारे हाय परफॉर्मन्स पेट्रोल.

आज आपण ह्या पॉवर पेट्रोल मुळे कशी ग्राहकांची फसवणूक होते ते माहीत करून घेणार आहोत. आणि हे पॉवर पेट्रोल खरंच जास्त चांगले असते का ते जाणून घेणार आहोत.

पेट्रोल पंप चालक किंवा कर्मचारी आपली फसवणूक करतात म्हणजे नक्की काय करतात?

आपण आपल्या गाडीत पेट्रोल भरायला म्हणून पेट्रोल पंपावर जातो. किती पेट्रोल भरायचे ते सांगून अगदी लक्षपूर्वक ‘झीरो’ तपासून पाहतो.

आपल्याला वाटतं की आपण फसणं शक्यच नाही. अगदी लक्ष देऊन आपण पेट्रोल भरून घेतो.

पण पैसे द्यायच्या वेळी तिथला कर्मचारी जास्त पैसे मागतो, का? तर आपल्याला न विचारता त्याने आपल्या गाडीत पॉवर पेट्रोल भरलेले असते, जे अर्थातच साध्या पेट्रोलपेक्षा महाग असते.

इथेच तर खरी मेख आहे. आपल्या परवानगीशिवाय पेट्रोल पंपवाले आपल्या गाडीत पॉवर पेट्रोल भरतात आणि त्यांचा फायदा करून घेतात.

खरंतर त्यांनी सर्वांना साधे पेट्रोल दिले पाहिजे जर कोणी मागितले तरच पॉवर पेट्रोल दिले पाहिजे.

आपण नक्की कुठले पेट्रोल भरले जात आहे हयाकडे फारसे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपले असे नुकसान होते.

इतरही अनेक प्रकारे पेट्रोल पंपावर आपली फसवणूक होऊ शकते. ही पण सर्वात जास्त छुपेपणानी होणारी फसवणूक आहे.

आपल्याला नको असताना महागडे पेट्रोल आपल्या गळ्यात मारले जाते.

बरं, हे पॉवर पेट्रोल म्हणजे असते तरी काय? जास्त पैसे मोजून ते घेतल्यावर निदान त्याचा आपल्याला खरंच फायदा तरी होतो का? चला, जाणून घेऊया.

हे पॉवर पेट्रोल म्हणजे साधं पेट्रोलच असतं पण त्यात एक्स्ट्रा ऍडिटिव्ह / डिटर्जंट घातलेले असते. ह्या ऍडिटिव्हमुळे पेट्रोलचे ऑक्टेन रेटिंग वाढते.

हे ‘ऑक्टेन रेटिंग’ पेट्रोलच्या ज्वलनशीलतेशी निगडीत असते. आणि गाडीच्या इंजिनसाठी आवश्यक असते. त्यामुळे कोणत्या प्रकारचे पेट्रोल वापरावे हे गाडीच्या इंजिनवर अवलंबून असते.

गाडीच्या इंजिनची बनावट कशी आहे त्यावर पेट्रोलचा वापर ठरतो आणि भारतातील ९९.९९% गाड्यांना साधे पेट्रोल वापरणे आवश्यक आहे.

खरे तर मारुती, हुंदई, टाटा, टोयोटा, फोर्ड, स्कोडा ह्या कंपन्या आवर्जून ग्राहकांना साधे पेट्रोल वापरा, पॉवर पेट्रोल वापरू नका असे सांगतात.

हे प्रत्येक कारच्या मोटारसायकलच्या मॅन्यूअलमध्ये देखील लिहिलेले असते. गाड्यांचे तज्ञ सर्विस एंजिनीअर्स सुद्धा साधे पेट्रोल वापरण्याचा सल्ला देतात.

फक्त परदेशी बनावटीच्या गाड्यांना पॉवर पेट्रोल उपयोगी असते. जर तुमच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडिज अशा परदेशी बनावटीच्या गाड्या असतील तर जरूर हाय परफॉर्मन्स पेट्रोल भरा. अन्यथा साधे पेट्रोल वापरा.

म्हणजेच पॉवर पेट्रोल वापरल्यामुळे आपल्या गाडीचे मायलेज वाढते, इंजिन चांगले राहते ह्या गोष्टी खऱ्या नाहीत.

भारतातील सर्व गाड्यांना साधे पेट्रोलच उपयुक्त आहे. असे असताना केवळ नफा कमवण्याच्या उद्देशाने आपल्याला पॉवर पेट्रोल भरायला लावणे ही आपली एक प्रकारची फसवणूकच नव्हे काय?

तर मित्रांनो, अशा फसवणुकीपासून सावध रहा. जागो ग्राहक जागो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।