मुस्लिम कुटुंबात जन्मलेली राहाफ़ मोहम्मद नास्तिक असून तिने दोन वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या सोळाव्या वर्षी मुस्लिम धर्माचा त्याग केला. आणि तेव्हापासून कुटुंबियांकडून तिचा छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे वडील सौदी सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. रविवारी घरातून पळून ती बँकॉकला गेली. कुटुंबाच्या तक्रारीवरून तिला बँकॉक विमानतळावर पकडण्यात आले. थायलंडच्या प्रशासनाने तिचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जमा करून ग्री पाठवण्यासाठी तिला एका हॉटेलच्या रूममध्ये बंदिस्त करण्यात आले.
या हॉटेलात असतानाच्या ४८ तासाच्या कालावधीत राहाफ़ मोहम्मद ने मोबाईलच्या माध्यमातून मानवाधिकार संघटनांकडे दाद मागितली. तिने थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडेही आपले म्हणणे मांडले. तिचे कुटुंबीय धर्माच्या विरोधात गेल्याने तिला मारून टाकणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. या गोष्टींना तिने वाचा फोडली सोशल मीडियावर. एकदा केस कापले म्हणून सहा महिने घरातील एका खोलीमध्ये डांबून ठेऊन तिचा छळ करण्यात आला असेही एका ट्विटमध्ये तिने म्हंटले आहे.
थायलँडच्या हॉटेलच्या रूममधून राहाफ़ मोहम्मद ने live ट्विट केलेला व्हिडीओ
— Rahaf Mohammed رهف محمد (@rahaf84427714) January 6, 2019
यासर्व प्रकाराला कंटाळून तिने आपले घर सोडले. या सोशल मीडियावर उघडलेल्या मोहिमेतून राहाफ़ला आंतरराष्ट्रीय माध्यमे, स्वयंसेवी संस्था तसेच मानवाधिकार संघटनांची मदत मिळाली. त्यानंतर तिची ‘घरवापसी’ करण्याऐवजी संयुक्त राष्ट्रसंघाला शरण जाण्याचा पर्याय तिच्यासमोर ठेवण्यात आला आहे.
The Thai authorities have granted UNHCR access to Saudi national, Rahaf Mohammed Al-qunun, at Bangkok airport to assess her need for international refugee protection and find an immediate solution for her situation.
— UNHCR, the UN Refugee Agency (@Refugees) January 7, 2019
Our statement: https://t.co/FVVGdUmHMu
सौदी अरेबियात महिलांबद्दलचे कठोर नियम या निमित्ताने सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. सध्या राहाफला थायलंडमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांसंबंधित काम करणाऱ्या उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेमध्ये ठेवण्यात आले आहे. तिला ऑस्ट्रेलियामध्ये आश्रय हवा आहे. तिच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल असे ऑस्ट्रेलियाने मंगळवारी कळवले आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.