तुमचा R.O. फिल्टर तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे का?

तुमचा R.O. फिल्टर नक्की तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे का?

आरओ (RO) फिल्टरने शुध्दीकरण केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असते का? शरीरासाठी चांगले असते का? R.O. चे पाणी पिऊन तुमच्या आरोग्याचे काही नुकसान तर होत नाहीये ना? जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
पाणी हे माणसाच्या प्रमुख गरजांपैकी एक आहे. माणूस एक वेळ अन्नाशिवाय जास्त काळ राहू शकेल परंतु पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जाण्यासाठी आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी पाणी पिणे अतिशय आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

 

पाणी पिणे जितके आवश्यक आहे तितकेच आपण पीत असणारे पाणी शुद्ध असणे आवश्यक आहे. पूर्वीपासून पाणी शुद्ध करण्याच्या अनेक पद्धती अमलात आणल्या जातात. यामध्ये पाणी गाळून घेणे, पाण्यावर तुरटी फिरवणे, पाणी उकळवून वापरणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे फिल्टर वापरणे या पद्धतींचा समावेश होतो.

यापैकी सध्याच्या काळात सर्वात लोकप्रिय झालेली पद्धत म्हणजे R.O. फिल्टर वापरणे. R.O. म्हणजेच रिव्हर्स ऑस्मॉसिस या पद्धतीचा फिल्टर आधुनिक असून सध्या घरोघरी अतिशय लोकप्रिय आहे. ह्या पद्धतीच्या फिल्टरमुळे पाण्यातील अशुद्ध तत्वे बाहेर टाकली जातात आणि पाणी शुद्ध होते असे सांगितले जाते. भरपूर प्रमाणात वापरली जाणारी ही एक आधुनिक पद्धत आहे.

परंतु ह्या विषयातील तज्ञ मात्र असे सांगतात की R.O. फिल्टरचे पाणी पिणे शरीराच्या आरोग्यासाठी तितकेसे चांगले नाही. R.O. फिल्टरचे पाणी पिण्याचे आपल्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होतात.

ते नेमके कोणते ते आज आपण पाहूया 

१. कुपोषण 

R.O. फिल्टर वापरुन जेव्हा पाणी शुद्ध होते तेव्हा त्यातील अशुद्ध घटकांबरोबरच शरीराला आवश्यक असणारे अनेक क्षार आणि पोषक तत्वे देखील बाहेर टाकली जातात.

असे आवश्यक क्षार पाण्यावाटे शरीरात न गेल्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. R.O. फिल्टर वापरुन शुद्ध केले गेलेले पाणी त्यातील क्षार नष्ट झाल्यामुळे अतिशय सॉफ्ट बनते त्यामुळे ते पाणी पचण्यास हलके बनते, परंतु अशा पाण्याची सवय झाल्यामुळे इतर कोणतेही पाणी पचवण्याची शरीराची क्षमता कमी होते आणि वारंवार आजारपण येऊ शकते.

शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार आजारी पडणे आणि बरे होण्यास जास्त वेळ लागणे असे दुष्परिणाम दिसून येतात.

२. हाडे कमकुवत होतात 

आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नीशियम ह्या दोन्ही खनिजांची आवश्यकता असते. अन्नाबरोबरच पाण्यातून देखील आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा पुरवठा होत असतो. परंतु R. O. फिल्टर द्वारे शुद्ध केलेल्या पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जवळ जवळ नष्ट होते.

त्यामुळे हाडे आणि स्नायू यांच्या बळकटीसाठी आवश्यक असणारे कॅल्शिअम आपल्याला कमी प्रमाणात मिळते. परिणामी शरीरातील हाडे कमकुवत होतात तसेच फ्रॅक्चर होण्याचा धोका देखील वाढलेला दिसून येतो.

वारंवार आर. ओ. फिल्टर केलेले पाणी पिण्यामुळे लहान मुलांमध्ये सुरुवातीपासूनच हाडे कमकुवत असणे, खेळताना पडले तरी लगेच फ्रॅक्चर होणे अशासारखे दुष्परिणाम दिसून येतात. अजिबात क्षार नसलेले पाणी प्यायले तर इतरही आजार होण्याची शक्यता बळावते.

३. स्वयंपाक करण्यासाठी हे पाणी योग्य नाही 

स्वयंपाक करताना पदार्थांमधील पोषकतत्वे टिकून राहण्यासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. तसेच पदार्थांमधील पोषकतत्वे वाढून त्यांचे पचन सुलभतेने व्हावे यासाठी पाण्यातील काही क्षार महत्त्वाची भूमिका बजावतात.

परंतु आर. ओ. फिल्टर द्वारे शुद्ध केले गेलेल्या पाण्यात असे क्षार जवळजवळ नसतातच. त्यामुळे अशा पाण्यात शिजवलेले अन्न शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण देऊ शकत नाही.

अन्नातून पुरेसे पोषण मिळाले नाही की शारीरिक कमजोरी येऊ शकते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती देखील कमी होते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचा धोका वाढतो.

तर मित्र मैत्रिणींनो, यावरून आपल्या असे लक्षात आले आहे की शरीराला अतिशय आवश्यक असणारे पाणी शुद्ध असावे हे तर खरेच परंतु ते पाणी अतिशुद्ध करण्याच्या नादात आपण त्यातील शरीराला आवश्यक असणारे क्षार आणि पोषक तत्वे नष्ट तर करत नाही ना याची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

मथितार्थ 

ह्यावरून असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की आपल्याला ज्या प्रकारच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या प्रकाराचा नीट अभ्यास करून त्या पाण्यातील पोषक तत्वे टिकून राहतील असा पाणी शुद्ध करणारा पर्याय आपण वापरला पाहिजे.

उगीच सगळे वापरतात म्हणून आधुनिकतेच्या नावाखाली आर. ओ. फिल्टर वापरणे आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते. आपले पिण्याचे पाणी शुद्ध तर असावेच परंतु पोषक देखील असावे.

तुम्ही तुमच्या घरी पाणी शुद्ध करण्यासाठी कोणता पर्याय वापरता हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, तसेच ही महत्वाची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेयर करा.

वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी माहित करून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।