जेष्ठ नागरिकांचे अधिकार डावलले जात आहेत का? होउ द्या चर्चा.
सुप्रीम कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय!
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सीनियर सिटीझन्स वाऱ्यावर? सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सीनियर सिटीझन्सच्या हक्क आणि अधिकारांच्या विरोधात आहे का? अशा प्रकारे कोर्टाने निर्णय दिल्यास सीनियर सिटीझन्स वर अन्याय होईल का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे खालील लेखातून आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय संविधानात प्रत्येक नागरिकाला आपले वेगवेगळे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला मग तो पुरुष असो अथवा स्त्री, लहान मूल असो अथवा प्रौढ नागरिक, तरुण असोत अथवा सीनियर सिटीझन्स सर्वांना कायद्याने योग्य ते अधिकार दिलेले आहेत.
सासरच्या घरात सुनांना देखील योग्य अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांचा गैरवापर करून सुनांनी आपल्याच सासू-सासर्यांचा छळ करू नये म्हणून अशा सासू-सासर्यांना देखील आपले योग्य असे अधिकार संविधानाने दिले आहेत.
परंतु काही घटनांमध्ये नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली होणारे निर्णय न्यायालयाकडून दिले जातात का? असे निर्णय अन्यायकारक ठरू शकतात का? कसे ते जाणून घेऊया.
सध्या प्रचलित असलेल्या कायद्यानुसार सीनियर सिटीझन असणाऱ्या आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित घरात नेमके कोणी-कोणी राहायचे याचा निर्णय सीनियर सिटीझन असणारे आई वडील स्वतः घेऊ शकतात. जर अशा सीनियर सिटीझन असणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा आणि सून आपापसात भांडत असतील, आई-वडिलांचा छळ करत असतील, त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करत नसतील तर अशा मुलगा व सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार सीनियर सिटीझन असणाऱ्या आई-वडिलांना सीनियर सिटीझन ऍक्ट द्वारे दिलेला आहे.
याचाच अर्थ एखाद्या जेष्ठ नागरिकाने स्वतःच्या कष्टांनी आणि स्वतःच्या पैशाने बांधलेल्या घरात त्यांना शांतपणे राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा, मुलगी, सून, जावई किंवा इतर नातेवाईक यापैकी कोणीही त्या घरावर थेट हक्क सांगू शकत नाही.
नेमके काय घडले?
परंतु नुकत्याच घडलेल्या एका घटनेत सुप्रीम कोर्टासमोर आलेल्या केस मध्ये मात्र थोडा वेगळा निर्णय दिला गेला. सुप्रीम कोर्टासमोर आलेल्या केस मध्ये ज्येष्ठ नागरिक असणारे सासू-सासरे विरुद्ध त्यांची सून असा खटला होता.
ज्येष्ठ नागरिक असणारे सासू-सासरे यांनी त्यांच्या सुने विरुद्ध दावा करून असे सांगितले होते की सुनेचे त्यांच्या मुलाशी पटत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होतात आणि त्याचा राग काढण्यासाठी सुनेकडून ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या सासू-सासर्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केले जात आहेत.
असे असल्यामुळे स्वतःच्या घरात शांतपणे राहता येण्यासाठी सदर जेष्ठ नागरिक आई-वडिलांनी सुनेला घराबाहेर काढण्यासाठी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला. अर्थातच त्यांनी सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक ऍक्ट द्वारे खालच्या कोर्टात दावा दाखल केलेला होता ज्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. परंतु सुनेने मात्र या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अर्ज केला.
सुनेच्या बाजूने असा दावा करण्यात आला की विवाहानंतर एखाद्या स्त्रीला मिळणाऱ्या अधिकारांमध्ये सासरच्या घरी राहण्याचा संपूर्ण अधिकार विवाहित स्त्रीला असतो. असे असताना सीनियर सिटीजन ऍक्ट द्वारे अशा विवाहित स्त्रीला घराबाहेर काढल्यामुळे तिच्या विवाहामुळे मिळणाऱ्या अधिकारांवर गदा येत आहे. विवाहित स्त्रीच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे सदर विवाहित स्त्रीला म्हणजेच सुनेला त्याच घरात राहण्याची परवानगी असावी.
आश्चर्यकारकरीत्या या घटनेमध्ये सुप्रीम कोर्टाने विवाहित स्त्रीच्या बाजूने म्हणजेच त्या सुनेच्या बाजूने निकाल दिला आणि जेष्ठ नागरिक असणाऱ्या सासू-सासर्यांना सुनेला घराबाहेर काढता येणार नाही असे सांगितले गेले.
सदर खटल्यामध्ये विवाहित स्त्रीच्या अधिकारांची पायमल्ली होऊ नये अशी काळजी घेत असतानाच सुप्रीम कोर्टाकडून नकळतपणे ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारांची पायमल्ली झाली आहे का? काय वाटते तुम्हाला?
या खटल्यात दिल्या गेलेल्या निकालाबद्दल तुमचे मत काय? अशा पद्धतीचे निकाल वारंवार लागले तर ते ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय करणारे ठरणार नाही का?
मानसिक अथवा शारीरिक छळ सहन करत ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्याच घरात राहायचे का? केवळ विवाहामुळे प्राप्त झालेल्या अधिकारांमुळे एखादी स्त्री आपल्याच वृद्ध सासू -सासर्यांचा छळ करत त्यांच्याच घरात सहजपणे राहू शकते का?
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत असताना कोर्टाकडून असे निर्णय दिले जाणे योग्य आहे का? याबद्दलचे आपले मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.