कशी असेल 2022 ची संक्रात. जाणून घ्या जन्मनक्षत्रानुसार होणारी संक्रांतीची फळप्राप्ती.
मकरसंक्रांत हा पौष महिन्यातला शेती संबंधित सण आहे.
सौर, म्हणजे सुर्याच्या कालगणनेशी संबंधित आहे.
संक्रांत ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते.
यावर्षी 2022 ला संक्रात देवता वाघावर बसून येणार आहे, तर तिचं उपवाहन घोडा आहे.
पिवळं वस्त्र परिधान केलेली संक्रात देवता हातात गदा घेऊन केशर तिलक लावून बसलेली कुमारिका आहे.
जाईचं फूल हुंगत, खीर खाणारी ही संक्रात देवता सर्प जातीची मोती रत्न धारण केलेली आहे.
यावर्षी संक्रात देवतेचं, वार नाव मिश्रा आणि नक्षत्र नाव नंदा आहे.
उत्तरेकडून दक्षिणेला निघालेल्या या देवतेला एक शीर नऊ हात आहे.
खरं तर मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात येतो.
असं मानतात की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात.
भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते.
मकर संक्रांतीच्या दिवशी दान केलं, सूर्य नवग्रह आणि देवदेवतांची पूजा केली तर नेहमीपेक्षा जास्त पुण्य मिळतं, अशी मान्यता आहे.
सूर्याने शनिदेवाला वरदान दिले आहे की वर्षातून एकदा ते मकर राशीत, शनिदेवाच्या राशीत येतील आणि शनिदेवांचं घर समृद्ध करतील.
मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे, कापूस, चादरी, वहाणा, धान्य, तीळ, गूळ, नवं भांड, तूप, जमीन, सोनं, घोडा, गाय यातल्या वस्तू ऐपतीप्रमाणे गरजूंना दान करा.
मकरसंक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून, सूर्य नवग्रहांची आणि भगवान विष्णूंची पूजा करा.
पुण्यकाळात दात घासू नका, कठोर बोलू नका, गवत कापू नका, जनावरांच्या धारा काढू नका.
सुर्याचा मकर राशीत प्रवेश दुपारी 2.28 मिनिटांनी होईल.
त्यामुळे 2.28 ते सुर्यास्तापर्यंत पुण्य काळ मानला जातो.
या संक्रांतीचं जन्म नक्षत्राप्रमाणे फळ असं असेल.
कृतीका, रोहिणी, मृग, या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींना प्रवास योग आहे.
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पुर्वा, या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींना शरीरपीडा होईल.
उत्तरा, हस्त, चित्रा या नक्षत्रांना व्यथेला सामोरं जावं लागेल.
स्वाती, विशाखा, जेष्ठा, पूर्वाषाढा अनुराधा आणि मूळ नक्षत्रांना वस्त्रप्राप्ती होईल.
श्रवण, धनिष्ठा, उत्तराषाढा यांना धननाशाची शक्यता आहे.
शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, अश्विनी, रेवती, भरणी या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींना भरपूर धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.