७५ व्या स्वातंत्र्य दिनी एसबीआयने आणली नवी होम लोन स्कीम. सविस्तर जाणून घ्या या लेखात
७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एसबीआयने आपल्या ग्राहकांना घरभाड्याच्या खर्चातून वाचवण्यासाठी एक नवी, झिरो प्रोसेसिंग होम लोन स्कीम आणली आहे.
अधिकृत ट्विटर हँडल द्वारे एसबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार ही नवी होम लोन स्कीम झिरो प्रोसेसिंग फी असणारी आहे.
म्हणजेच या स्कीम द्वारे अप्लाय करणाऱ्या ग्राहकाला प्रोसेसिंग फी शून्य रुपये पडेल. याचाच अर्थ काहीही प्रोसेसिंग फी लागणार नाही.
ह्या व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय महिलांसाठी देखील इंटरेस्ट रेट मध्ये आकर्षक सूट दिली आहे.
जर होम लोनची फर्स्ट एप्लिकंट एक महिला असेल तर लोन वर लागणाऱ्या व्याजा मध्ये विशेष सूट एसबीआय कडून दिली जात आहे. सध्या या स्किन वर एसबीआय कडून ६.७० % इतका व्याजदर लागला जात आहे.
अप्लाय कसे करायचे?
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट पासून ग्राहकांना सदर स्कीममध्ये अप्लाय करता येईल.
त्यासाठी नागरिक स्वतंत्रपणे एसबीआयकडे एप्लीकेशन देऊ शकतात. ७२०८९३३१४० ह्या नंबर वर मिस कॉल देऊन देखील या स्कीमला अप्लाय करता येईल.
तर मित्रांनो या होम लोन स्कीमचा जरूर लाभ घ्या. प्रोसेसिंग फी वाचवा. तसेच आपल्या गृहलक्ष्मीचा घरातील सहभाग वाढवा आणि घराचे मालक व्हा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.