आजच्या धावपळीच्या युगात कामाचे स्वरूप आणि अनियमित आणि बेशिस्त दैनंदिनी याचा सर्वात प्रथम परिणाम होतो तो शरीरातील हाडांवर.
माणसाच्या शरीरात एकूण २०६ हाडे असतात. त्यातील मुख्य हाड हे पाठीच्या कण्याचे असून त्यामुळेच मनुष्य ताठ उभा राहू शकतो आणि बसू शकतो. ते हाड नसले असते तर मनुष्य हा काही प्राण्यांसारखा वाकलेला असता. आजच्या या लेखामध्ये आपण हाडांच्या एका आजारासंबंधी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचे नाव आहे स्पॉन्डिलिसिस.
स्पॉन्डिलिसिस म्हणजे काय?
स्पॉण्डिलायसिस हा आजार पाठीच्या कण्यावर प्रत्यक्ष परीणाम करतो. त्याचप्रमाणे या आजाराचे परिणाम मानेवर आणि पाठीशी संलग्न असणाऱ्या कमरेवरसुद्धा होतात. स्पॉन्डिलिसिसमुळे भविष्यात ऑस्ट्रिओ आथ्राइटिस सारखा सांध्यांचा आजारही बळावू शकतो.
स्पॉन्डिलिसिसची लक्षणे कोणती?
प्रत्येक रुग्णाच्या शरीराप्रमाणे या आजाराची लक्षणे कमी अधिक प्रमाणात असतात. पण ज्याची शारीरिक श्रम करण्याची क्षमता कमी असेल, त्यांना हा आजार जास्त त्रासदायक ठरतो असे दिसून येते. तसेच या आजाराचे काही प्रकार आहेत. त्यावर सुद्धा लक्षणं अवलंबून असतात.
यामध्ये सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे झोपेतून उठताच पाठ कडक होऊन दुखायला लागणे.
जास्त वेळ बसल्याने पाठीचा कणा ताणल्या जातो, त्यामुळे जास्त वेळ बसून राहणे शक्य होत नाही.
हे सुद्धा स्पॉण्डिलायसिस चे प्रमुख लक्षण आहे.
त्याचबरोबर खाली वाकल्यास कमरेत उसण भरणे, जड वस्तू उचलल्यास कमरेत वेदना होणे, डोके जड झाल्यासारखे वाटून दुखू लागणे, खांदे आणि मान यामध्ये वेदना होणे, पायांचा तोल गेल्यासाखे वाटणे, अशक्तपणा येणे, लघुशंकेवर अनियंत्रण, एकाच स्थितीत झोपल्यास पाठ अखडून येणे, खांद्यांना आलेला वाक, छातीच्या बरगाड्यांमध्ये वेदना होणे ही लक्षणे आजार बळावत जातो तशी वाढत जातात.
काहींना मानेचा स्पॉन्डिलिसिस असेल तर त्यांना प्रवासात अंगाला झटके बसल्यास मान दुखू लागते.
काहींना कमरेचा स्पॉण्डिलायसिस असतो त्यांना कंबर आणि त्याखालील भाग दुखून त्रास सहन करावा लागतो.
स्पॉण्डिलायसिस कशामुळे होतो ?
हा आजार होण्याची अशी काही मुख्य करणे वैद्यकीय अभ्यासात नमूद केलेली नाहीत. तरीही डॉक्टरांच्या मते हा आजार बसण्या उठण्याच्या आणि झोपण्याच्या अयोग्य पद्धतीने होऊ शकतो.
तसेच काही लोकांकडे अनुवंशिकतेने हा आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातो.
किंवा ज्या लोकांना कमरेचा फार पूर्वीपासूनच त्रास आहे त्यांना हा आजार लवकर होतो.
ज्यांचे अपघात झाले आहेत किंवा काही गंभीर
दुखापत झाली आहे त्यांना स्पॉण्डिलायसिस ची समस्या जास्त त्रासदायक ठरते.
शरीर एकाच अवस्थेत राहून अखडून जाते त्यामुळे त्याला नियमित व्यायामाची गरज असते.
व्यायाम न केल्यामुळे शरीरातील हाडांमध्ये काठिण्य येऊन लवचिकता निघून जाते. त्यामुळे हा आजार बळावतो.
हल्ली, तासंतास संगणकावर काम करणाऱ्या सलग ८ ते ९ तास एकाच ठिकाणी एकाच स्थितीमध्ये बसून स्पॉण्डिलायसिस चा त्रास उदभवल्याच्या अनेक तक्रारी डॉक्टरांकडे येत असतात.
याचा परिणाम खांद्यांवर, मानेवर , कमरेवर आणि डोक्यावर सुद्धा होतो. पाठीचा कणा सर्व शरीराला आधार देण्याचे काम करत असतो.
एकदा का जर त्यावर प्रमाणापेक्षा जास्त ताण पडू लागला तर त्याचा शरीराच्या इतर
अवयवांना त्रास होऊ लागतो.
आजकाल अनेक तरुण या समस्येने ग्रासलेले आपल्याला दिसेल. यासाठी योग्य वेळी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे.
स्पॉन्डिलिसिस होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?
- बैठे काम असल्यास सलग खूप वेळ बसू नये, मध्ये मध्ये उठून बसण्याची स्थिती बदलत राहावी.
- बसताना एकदम झटक्याने बसू नये. सावकाश बसावे.
- बैठे काम असल्यास बसल्या-बसल्या जे शक्य असतील ते व्यायाम करत राहावे.
- वजन नियंत्रित ठेवावे.
- हाडे मजबूत राहण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा.
- आनंदी राहावे.
- आत्मविश्वास टिकवून ठेवावा.
- नियमित व्यायाम करावा. त्यामुळे हाडांचा लवचिकपणा टीकून राहतो.
स्पॉण्डिलायसिसच्या रुग्णाला काही दुखापत झाल्यास, सर्व प्रथम मानेला आणि पाठीला इजा होऊ शकते.
त्यामुळे कुठलेही काम करताना पाठीवर किंवा मानेवर ताण येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
ज्यांना स्लिप डिस्क सारखा कमरेचा गंभीर आजार झाला असेल किंवा होऊन गेला असेल त्यांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
आम्हाला आशा आहे कि या लेखामध्ये नमूद केलेली माहिती आपल्यासाठी उपयुक्त असेल.
स्पॉण्डिलायसिस या आजाराविषयी जास्तीत जास्त जागरूकता पसरवण्यासाठी हा लेख नक्की शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mla pn tras ahe manecha ani pathicha
REALLY VERY NICE GUIDANCE & INFORMATION.
I LIKE ABOVE POST.
THANKING YOU.
ALL THE BEST & MAY ALMIGHTY GOD BLESS YOU.
मला हा त्रास आहे