मूग डाळीत प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह यांसारखी पोषक तत्वे असतात. शिवाय मोड आलेले मूग खायला चवदार सुद्धा असतात.
मोड आलेल्या मुगाचं चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- मोड आलेले मूग: २ कप
- कांदा: १ बारीक कापलेला
- टोमॅटो: १ बारीक कापलेला
- काकडी: १ बारीक चिरलेली
- गाजर: १ बारीक चिरलेले
- हिरव्या मिरच्या: २ बारीक चिरलेल्या
- लाल मिरची पावडर: १/४ टीस्पून
- चाट मसाला: १ टीस्पून
- लिंबाचा रस: १ टीस्पून
- बटाटा: १ उकडलेला
- कोथिंबीर: बारीक कापलेली
- बारीक शेव: ३ टीस्पून
- पाणी: ४ कप
- मीठ: चवीनुसार
मोड आलेल्या मुगाचे चाट बनवण्याची कृती:
१. मोड आलेले मूग प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत उकडून घ्या.
२. उकडलेला बटाटा अगदी बारीक चिरून किंवा किसून एका बाउल मध्ये काढून घ्या.
३. उकडलेले मूग आणि उकडलेल्या बटाट्याचे मिश्रण करून घ्या.
४. त्यात साहित्यात दिलेल्या प्रमाणानुसार सर्व मसाले एकत्र करा.
५. लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करा.
६. यावर सर्व्ह करताना बारीक शेव भुरभुरावी.
७. पाणीपुरीच्या पुऱ्यांचे तुकडे सुद्धा यात कुरकुरीतपणा आणण्यासाठी सर्व्ह करताना टाकता येतील.
अशा प्रकारचा पौष्टिक नाश्ता कॅलरीज वर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा चांगला आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.