काय मित्रांनो, लेखाचं शीर्षक वाचून अगदी आश्चर्यचकित झालात ना?
जगभर सगळीकडे सगळेजण ताजे अन्न खाण्याचा सल्ला देत असताना हे असं काय लिहिलंय? शिळी पोळी खाण्याचे फायदे?
पण थांबा, हे खरं आहे, शिळी पोळी खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. ते कोणते हे आपण आज ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
आपल्याकडे जर शिळ्या पोळ्या उरल्या तर आपण काय करतो? शिळं अन्न कसं खाणार असं वाटून त्या पोळ्या टाकून देतो, पण आता असं करू नका. खरंतर पूर्वी महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरात सर्रास दुधपोळी खाल्ली जायची. आता बाजारात तर्हेतर्हेचे पोटभरीचे जिन्नस आल्यापासून दूधपोळी जरा मागे पडली…
कारण ह्या शिळ्या पोळ्यांमध्ये गव्हाचे सगळे गुणधर्म तर असतातच शिवाय फायबर भरपूर प्रमाणात असते आणि सोडियम हे कमी प्रमाणात असते.
त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना शिळी पोळी खाणे अतिशय उपयुक्त आहे. दुधाबरोबर शिळी पोळी खाल्ली तर ती अधिकच गुणकारी होते. तसेच ह्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ते आपण विस्ताराने पाहूया…
१. शरीराचे तापमान नियंत्रित करते
सामान्यतः आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते.
त्यापेक्षा जास्त तापमान वाढले तर ते आपल्या शरीराला हानिकारक आहे.
अशा वेळी थंड दुधात कुस्करलेली शिळी पोळी खाल्ली तर वाढलेले तापमान (ताप) कमी होण्यास मदत होते. तसेच सकाळी रिकम्या पोटी शिळी पोळी आणि गार दूध घेतले तर ते पौष्टिक तर आहेच पण ऍसिडिटी देखील कमी करते.
२. अपचनावर उपयुक्त आहे
जे लोक नेहेमी पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असतात त्यांच्यासाठी शिळी पोळी हा उत्तम घरगुती उपाय आहे.
रात्री झोपण्याआधी गार दुधात कुस्करलेली शिळी पोळी खाल्ली असता अपचन, ऍसिडिटी आणि गॅसेस सारख्या समस्यांवर नियंत्रण आणता येते.
३. रक्तदाब नियंत्रित करते
गार दुधासोबत खाल्लेली शिळी पोळी ही रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. रक्तदाब जास्त असेल तर शिळ्या पोळीचे तुकडे १० मिनिटे गार दुधात भिजवून ठेवा आणि त्यानंतर नाश्ताच्या वेळी त्याचे सेवन करा. रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
४. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिळी पोळी हे वरदान आहे. शिळ्या पोळीचे तुकडे १० मिनिटे गार दुधात भिजवून ठेवा आणि त्यानंतर दिवसातल्या कोणत्याही वेळी त्याचे सेवन करा.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांना दररोज शिळी पोळी आणि दूध घेणे फायदेशीर आहे.
तर हे आहेत शिळी पोळी खाण्याचे फायदे. परंतु शिळी पोळी खाताना काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मुख्य गोष्ट ही की पोळी केल्यानंतर जास्तीत जास्त १२ ते १५ तासात ती खाल्ली पाहिजे.
त्यापेक्षा जास्त शिळी झालेली पोळी खाणे आरोग्यास हितकारक नाही. तसेच नुसती कोरडी शिळी पोळी न खाता ती दुधाबरोबरच खाल्ली पाहिजे म्हणजेच त्याचे फायदे दिसून येतील पौष्टिकता वाढेल.
तर असे आहेत शिळ्या पोळीचे फायदे. त्यामुळे आजपासून पोळी शिळी झाली म्हणून टाकून न देता तिचे योग्य प्रकारे सेवन करा आणि अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nyc