अंकित आणि अनुभव रोज कमीत कमी २० तरी लव्ह लेटर लिहितात.
नाही, नाही त्यांना २०-२० गर्लफ्रेंड्स आहेत असं काही समजू नका बरं!!!
आपल्याला काय वाटतं बिजनेस करायचा म्हणजे खूप काहीतरी नवी इनोव्हेटिव्ह आयडिया हवी, हातात भक्कम असं भांडवल हवं. हो ना!!
पण जुन्या परंपरांनाच नवीन रूपात पाहण्याचा प्रयत्न केला तर बरेचदा काहीतरी भन्नाट सुचू शकतं. आणि त्यातून एक स्टार्टअप सुद्धा उभा राहू शकतो. पण त्यापुढे मात्र कमालीची मेहेनत करण्याची तयारी आणि चिकाटी असावी लागते. आज आपण एका तुम्ही आम्ही विचारही केला नसेल अशा स्टार्टअप बद्दल बोलू.
हो पत्र लिहिण्याचा स्टार्टअप….
व्हाट्स ऍप, फेसबुक, व्हिडीओ कॉल या सगळ्यात पत्र लिहिण्याची परंपरा लोप पावली. ती रस्तोरस्ती दिसणारी लाल पत्रपेटी तर आता शोधून सुद्धा सापडत नाही. आजकालच्या हायप्रोफाईल शाळांमध्ये मुलांना काहीतरी विशेष म्हणून पत्र लिहिण्याची आणि आपल्या एखाद्या मित्राचा पत्ता टाकून ते पत्र पत्रपेटीत टाकण्याची एक ऍक्टिव्हिटी म्हणून देतात. का तर पत्र टाकण्याची पद्धत नव्या पिढीला माहित व्हावी!!
व्हाट्स ऍप, फेसबुक, इ-मेल यातून जाणारे संदेश खूपच कोरडे वाटतात नाही!! शब्दांना कागदावर हाताने लिहिणं यातलं प्रेम किंवा थ्रिल आजही लोकांना खुणावतं. आणि हीच गोष्ट हेरली अंकित आणि अनुभव या दोघा इंजिनिर्सने. आणि त्यांनी हस्तलिखित पत्र लिहिण्याचं स्टार्टअप सुरु केलं. The Indian handwritten letter corporation या नावाने त्यांनी कम्पनी चालू केली. अनुभव सांगतो त्यांची कम्पनी चांगली फास्ट ग्रो होत आहे. सहा महिन्यात त्यांनी २५०० पेक्षा जास्त हस्तलिखित पत्रे पाठवलीत. आणि यातली जास्तीत जास्त हि लव्ह लेटर आहेत. म्हणजे कोणाला पत्राच्या माध्यमातून आपली आपल्या प्रेमी प्रेमिके बरोबर संवाद करायचा असेल आणि गुंफण्यासाठी शब्द मिळत नसतील तर ते हि सर्व्हिस घेतात. तसे यामध्ये आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक कुणासाठीही पत्रे पाठवण्यासाठी लोक देऊ शकता.
भावना सगळ्यांकडेच असतात पण बरेचदा शब्द नाही सापडत याच गोष्टीला ताडून अंकित आणि अनुभवाने हा स्टार्टअप सुरु केला. आणि भारतातल्या जवळ जवळ सर्वच भाषांमध्ये ते या माध्यमातून पत्र लिहितात.
स्टार्ट अप ची आयडिया कशी आली.
अंकित इंजिनियर म्हणून एका कम्पनित नोकरी करत होता. २०१३ साली हॉलिवूडची एक “HER” नावाची फिल्म आली होती. त्यातला हिरो हा लेटर रायटर असतो. म्हणजे लोकांच्या भावना तो पत्रात उतरवतो. अंकित घरापासून दूर राहून नोकरी करत असताना हाताने लिहिलेल्या पत्राची मजा काही औरच असेल या विचाराने त्याला या स्टार्टअप ची कल्पना सुचली.
२०१५ साली त्याने एका ब्लॉगच्या माध्यमातून हा विचार काम करू शकेल का, हे पाहण्यासाठी एक सर्व्हे केला तर त्याला १४० पर्यंत मेल्स आले कि तुम्ही कुठल्या भाषांत लिहाल, स्वरूप कसे असेल वगैरे, वगैरे…
यामुळे अंकिताला आयडिया काम करेल याबद्दल खात्री मिळाली आणि २०१६ मध्ये आपल्या काही मित्रांची टीम घेऊन त्याने The Indian handwritten letter corporation सुरु केली. प्रति शब्द २.५० रुपये आणि लिहिलेले पत्र फक्त एडिट करायचे असेल तर प्रति शब्द १ रुपया असा चार्ज हि कम्पनी घेते.
म्हणजे काही हटके विचार आणि मेहेनत करण्याची तयारी एवढं असेल तर कुठल्याही गोष्टीतून विचारातून आल्याला काहीतरी संधी सापडू शकते. मग आता कमेंट्स मध्ये असेच काही हटके विचार लिहून पाठवा. न जाणे एखाद्याचा स्टार्टअप उभा राहून जाईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.