विकी डोनर पिक्चर बरेच जणांनी पहिली असेल… काय वाटलं पिक्चर पाहून?
नक्कीच एंटरटेनमेंट!! एंटरटेनमेंट!!! एंटरटेनमेंट!!!!
पिक्चर बनवताना विचार केला गेला असेल की गंभीर करून विषय दाखवला तर डॉक्युमेंटरी वाटेल… त्यामुळे विषय हलकं फुलकं मनोरंजन होईल असा हाताळला गेला…. प्रेक्षकांनी पिक्चर पहिला आणि पैसा वसूल म्हणून थेटर बाहेर आले.
पण खऱ्या स्पर्म डोनर चं आयुष्य कसं असतं हे एवढ्यातच राजुलला (नाव आणि ठिकाण गोपनियतेसाठी बदललेले आहे) भेटल्यावर समजलं. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा ‘विकी डोनर’ पिक्चर पहिला.
राजुल सांगत होता, मी जेव्हा पहिल्यांदा स्पर्म द्यायला गेलो तेव्हा खूप अनकम्फर्टेबल होतो. एवढंच काय भीती सुद्धा होती. त्याआधी दोन वेळा ब्लड डोनेशन केलं होतं. आणि अभिमानाने फेसबुकवर फोटो पण अपलोड केले होते. पण हे डोनेशन का माहीत नाही पण त्या वेळेस मला सुद्धा लाजीरवाणं वाटत होतं.
राजुल त्या वेळेस २२ वर्षांचा होता. शिक्षण होऊन मनाजोगी नोकरी मिळाली नव्हती. बँगलोरसारख्या मेट्रोसिटीत शिकल्याने पुन्हा माघारी आपल्या गावी जाण्याची त्याची तयारी नव्हती. त्यामुळे मिळेल तशी नोकरी करून वरकमाई काय होऊ शकते या शोधात त्याला स्पर्म डोनेशन बद्दल समजलं.
पुढे राजुल पहिल्या वेळची ती आठवण सांगताना काहीसा गंभीर आणि थोडा मिश्किल सुद्धा होतो, “रिसेप्शनवर सांगितल्या प्रमाणे मी वॉशरूम मध्ये गेलो.
वॉशरूम अगदी साधं, कमोड, नळ, वॉशबेसिन…. आपल्या रूममध्ये हस्तमैथून करणं आणि विकण्यासाठी करणं यात मोठा फरक आहे. वॉशरूम मध्येच एका रॅकवर रांगेत काही प्लास्टिकचे कंटेनर ठेवले होते. वेगवेगळी नावं त्यावर लिहिली होती. त्यातलं माझ्या नावाचं कंटेनर मी उचललं.
आणि हस्तमैथुन करून झाल्यावर ते कंटेनर सांगितल्याप्रमाणे बंद करून दुसऱ्या रॅकवर ठेवलं. आणि याचे मला ४०० रुपये मिळाले.”
या वयात गर्लफ्रेंड असणं किंवा असावी असं वाटणं यात गैर काही नाही. पण याचा अर्थ असा नाही होत की असे सगळेच, शारीरिक संबंध ठेवतात…. हे असं फक्त मुलांचंच नाही तर मुलींच्या बाबतीत सुद्धा असंच असतं.
पण मुलांकडे असा हस्तमैथून करण्याचा पर्याय तरी असतो. पुढे राजुल सांगतो, मला माहित नव्हतं की जे मी आजपर्यंत वाया घालवत होतो ते कधीतरी असं विकायला जाईल.
एकदा पेपरमध्ये एक आर्टिकल वाचून राजुलला स्पर्म डोनेशनबद्दल समजलं. त्यात लिहिलं होतं की, भारतात असे लाखो दाम्पती आहेत जे स्पर्मच्या गुणवत्तेमधल्या कमीमुळे संतान जन्माला घालू शकत नाहीत.
त्यामुळे स्पर्म डोनेशन बँक बऱ्याच मोठ्या शहरात सुरू झालेल्या आहेत. आणि यात स्पर्म डोनेशनसाठी कोणाशीही शारीरिक संबंध ठेवणे हा त्याचा अर्थ अजिबात नाही.
पुढे जास्त माहिती शोधली तेव्हा त्याला समजलं बँगलोर मधील एका भागात सुद्धा स्पर्मडोनेशन सेंटर आहे.
राजुल सांगतो मी असं करत असल्याबद्दल माझ्या घरी अजिबात समजू देत नाही. कारण छोट्या शहरात राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांना याचा मोठा धक्का बसेल. राजुलच्या मित्रांमध्ये मात्र आता ही गोष्ट सामान्य आहे.
यावर मी राजुलला विचारलं की ही गोष्ट पुढे तू तुझ्या गर्लफ्रेंडला किंवा अगदी बायकोला सांगशील का?
त्यावर तो सांगतो की अजून माझी कोणी गर्लफ्रेंड नाही पण जेव्हा असेल तेव्हा तीला मी सांगेल. पण बायकोला नाही. कारण कुठल्याच बायकोला आपल्या नवऱ्याने कधीतरी बाहेर जाऊन स्पर्म दिले किंवा विकले होते हे आवडणार नाही.
पुढे तो हसून सांगतो, की तसंही मी काही जास्त दिवस हे चालू ठेवणार नाही.
माहिती करून घेतली तेव्हा कळलं की स्पर्म खरेदी करणारे लोक हे अविवाहित आणि वयाच्या पंचवीशीच्या आत असलेल्या तरुणांचेच स्पर्म घेण्यास प्राधान्य देतात.
स्पर्मची किंमत फक्त स्पर्मच्या गुणवत्तेवरच ठरते असे नाही. डोनरची वैयक्तिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे या गोष्टींची चौकशी सुद्धा स्पर्म विकत घेणारे दाम्पती करतात.
आई, वडील काय करतात, शिक्षण काय झालं या गोष्टी सुद्धा येथे बघितल्या जातात.
पुढे अगदी महत्त्वाचं सांगायचं राहून गेल्यासारखं थांबवून राजुलने सांगितलं की ‘तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंग्लिश येणाऱ्यांच्या स्पर्मची किंमत जास्त असते.’
राजुल सांगतो की, माझी आई किंवा माझ्या बायकोसाठी ही गोष्ट लाजीरवाणी असेल की मी स्पर्म डोनेशन करतो. एवढंच काय समाजाने सुद्धा स्पर्म डोनेशन हा प्रकार तितका स्वीकारलेला नाहीये.
पण या वयाची मुलं हेस्तमैथुन करतात हे कोणाला माहीत नाहीये का? स्पर्म डोनेशनला जर लाजिरवाणं मानलं तर हस्तमैथुन सुद्धा लाजिरवाणंच आहे!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.