जरी निसर्गामध्ये आपण मानव प्राणी एकसमान असलो तरीही स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये काही फरक असतात जे या दोघांची व्यक्तिमत्वं वेगळी घडवतात.
खरंतर व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं.
त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामधील भेद सांगणं तसं अवघड आहे.
मुळात मानवी वर्तन किंवा मानसशास्त्र हा प्रचंड गुंतागुंतीचा विषय आहे. त्याची अमुक एक अशी व्याख्या ठामपणे सांगता येत नाही.
लोकांमध्ये दिसून येणाऱ्या ट्रेंडचा किंवा वर्तनाचा अभ्यास मात्र करता येतो आणि त्यातून व्यक्तिमत्त्वाचा किंवा मानसिक वर्तनाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्नही केला जातो.
प्रत्येक माणूस हा एक युनिट प्रॉडक्ट असतो त्याचे विचार त्याची क्रिया, प्रतिक्रिया देहबोली ही वेगळीच असते.
तरीही एकाच वयाच्या, एकाच भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या किंवा ब-याच स्त्रियांमध्ये आणि ब-याच पुरुषांमध्ये काही समानता आढळून येते.
पुरुष आणि स्त्रिया जैविकदृष्ट्या भिन्न असतात. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लक्षणीय फरक असतात.
असे कोणते फरक स्त्रिया आणि पुरुषांमध्ये प्रामुख्याने असतात ते जाणून घेऊया.
1) भावनांची ओळख
मानवी मनात चालणाऱ्या भावना चेहऱ्यावरती सहज उमटत असतात.
चेह-यावर उमटणा-या भावनांपैकी स्त्रिया द्वेष किंवा तिरस्काराच्या भावना चटकन ओळखण्यात वाकबगार असतात.
याउलट पुरुष मात्र समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आनंदाच्या छटा समजू शकतात.
याचं एक नैसर्गिक कारण म्हणजे स्त्रिया या मुलांना जन्म देतात त्यामुळेच त्या अधिक संवेदनशील असतात.
मुलांच्या आसपास असणारं संभाव्य दूषित वातावरण त्या टीप कागदासारखं सहज टिपून घेत असतात.
2) बहिर्मुखता
बहिर्मुख असणार्या स्त्री आणि पुरुषांमध्ये सुद्धा लक्षणीय फरक असतो.
लक्ष वेधून घेण्याची क्षमता स्त्री आणि पुरुषांमध्ये सारखीच असते.
दोघांकडे सेम एनर्जी असू शकते.
सामाजिक बांधिलकी दोघांच्यामध्ये सारख्या प्रमाणात असू शकते.
पण एकाच पातळीवर रोमँटिक असूनही या दोघांच्यामध्ये फरक असू शकतो.
संशोधनातून समोर असं आलेलं आहे की बहिर्मुख असणाऱ्या स्त्रीला रोमँटिक आनंदाचा अनुभव कमी प्रमाणात मिळतो.
शिवाय महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत व्यावसायिक बांधिलकी कमी प्रमाणामध्ये बघायला मिळते.
3) महिला जास्त कामसू असतात
एका अभ्यासानुसार असं लक्षात आलेलं आहे की स्त्रिया या कामांमध्ये जास्त गुंतलेल्या असतात.
पुरुष सरासरी रोज 113 मिनिटं विश्रांती घेतात तर बायका मात्र फक्त 101 मिनिटे विश्रांती घेतात.
म्हणजे पुरुष आठवड्याला दीड तास, वर्षाला 70 तास जास्त विश्रांती घेतात.
स्त्रिया मात्र स्वतःला सतत कामात गुंतवून घेतात.
4) स्त्रिया सुसंवाद करू शकतात.
संशोधनात असे सिद्ध झाले आहे की पुरुष हे स्त्रियांपेक्षा अमूर्त भाषेमध्ये जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात.
तपशीलवार सांगण्यापेक्षा मोजकच सांगणं त्यांना जास्त आवडतं.
महिला संवाद साधताना रचनात्मक आणि पारदर्शक असतात एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची त्यांच्याकडे कला असते.
5) एकटेपणाची जाणीव
स्त्री आणि पुरुष दोघांनाही आयुष्यात कधी ना कधी एकटेपणाचा सामना करावा लागतो.
मात्र दोघांमध्ये हे एकटेपण वेगवेगळ्या टप्प्यावर येतं.
पुरुषांना मध्यम वयात एकाकीपण ग्रासतं तर महिलांना उतारवयात एकटेपणा सतावतो.
तर स्त्रिया आणि पुरुष यांच्यात भावनात्मक पातळीवर हे ठळक फरक आपल्याला अनुभवता येतात.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mala pan mazya navryala akarshit karayach ahe