स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

जन्मतःच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगण्याची क्षमता घेऊन येतात. जगभरातील संशोधनाचे आकडे हेच सिद्ध करतात. वेगवेगळ्या सर्व्हे मध्ये असे आढळून आले आहे की, अमेरिकेत महिला पुरुषांपेक्षा सरासरी ६.५ वर्षे, ब्रिटनमध्ये ५.३ वर्षे, रशियामध्ये १२ वर्षे तर भारतामध्ये सरासरी सहा महिने जास्त जगतात.

वेगवेगळ्या शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक कारणांचा स्त्रिया आणि पुरुष यांच्या दीर्घायुषी असण्यावर प्रभाव पडत असतो. खरे तर उत्क्रांतीच्या काळापासून मूल जन्माला घालण्याची क्षमता असल्यामुळे मनुष्य जातीची वाढ होत राहण्यासाठी स्त्रिया अधिक सुदृढ आणि सक्षम शरीर घेऊनच जन्माला येतात.

परंतु सध्याच्या काळात मात्र स्त्रियांच्या या शारीरिक कणखरपणाची हानी होत असताना दिसते. उदाहरण द्यायचे झाले तर दर महिन्याला मासिक पाळी येत असल्यामुळे अनेक स्त्रिया ॲनिमिया ग्रस्त असलेल्या दिसून येतात. त्यामुळे शरीरातील लोहाची मात्रा कमी होऊन काही महिलांचा मृत्यु देखील ओढवू शकतो.

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात त्याला काही शास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे आहेत. ती कोणती ते आता आपण सविस्तरपणे पाहूया.

१. शास्त्रीय कारणे 

स्त्रिया आणि पुरुषांच्या शारीरिक रचनेमध्ये शास्त्रीय दृष्ट्या काही फरक आहेत. कोणत्याही सजीव प्राण्याचे शरीर जनुकांनी बनलेले असते. मानवामध्ये या जनुकांमध्ये X आणि Y अशी गुणसूत्रे असतात. या जनुकांमुळे पुढच्या पिढीमध्ये आधीच्या पिढीच्या अनुवंशिक बाबी संक्रमित होताना दिसून येतात. त्यामध्ये रंग, चेहऱ्याची ठेवण, उंची आणि काही विशिष्ट आजार यांचा समावेश होतो.

आपण सर्व हे जाणतो की स्त्रियांमध्ये XX अशी गुणसूत्रांची जोडी असते तर पुरुषांमध्ये X आणि Y गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रांमुळे अनुवंशिक परिवर्तन होताना स्त्रियांना अधिक लाभ होतो कारण त्यांची गुणसूत्रे समान असतात. सर्व सजीव जमातीमध्ये महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असलेल्या आढळून येतात.

महिलांमध्ये आढळून येणारे हॉर्मोन एस्ट्रोजेन आणि महिलांच्या शरीराची गर्भधारणा करण्याची क्षमता तसेच स्तनपान देण्याची क्षमता यामुळे महिलांमध्ये दीर्घायुषी असण्याचे प्रमाण जास्त असते. एस्ट्रोजन हार्मोन्समुळे रक्तातील लिपिड या द्रव्याचे प्रमाण संतुलित राहते तसेच हृदयविकारावर देखील नियंत्रण ठेवले जाऊ शकते. त्यामुळेच आपण पाहतो की स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अतिशय कमी असते.

त्याचप्रमाणे महिलांमध्ये जास्त प्रमाणात असणारे हे एस्ट्रोजन हार्मोन महिलांच्या शरीरातील चांगल्या प्रतीच्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते आणि वाईट प्रतीच्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. ह्या उलट पुरुषांमध्ये आढळणारे टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन शरीरातील वाईट प्रतीचे कोलेस्ट्रॉल वाढवू शकते आणि चांगल्या प्रतिच्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. त्याच मुळे पुरुषांमध्ये हृदयविकार किंवा पक्षाघाताचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आढळून येते. ही आहेत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगण्याची शास्त्रीय कारणे.

२. मानसशास्त्रीय कारणे 

स्त्रियांमध्ये उपजतच स्वतःच्या जीवाला जपण्याची प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती स्त्रियांमध्ये निसर्गतः असते. निसर्गाने तशी सोय केलेली असते कारण स्त्री पुढे जाऊन नव्या जीवाला जन्म देणार असतो.

मानवजातीच्या वंशवृद्धीसाठी स्त्रियांमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच नैसर्गिक रित्त्या पुरुषांपेक्षा स्त्रियांचा स्वतःला जपण्याकडे कल असतो.

म्हणूनच आपल्याला लहानपणापासूनच मुलग्यांचा कल धांगडधिंगा करण्याकडे तर मुलींचा कल बैठे खेळ खेळण्याकडे असतो हे दिसून येते. (ह्याला अपवाद अर्थातच असू शकतात. शांत बसणारी मुले आणि दंगा करणाऱ्या मूली देखील नॉर्मल, सुदृढ असतात.)

अशाच स्वतःला जपण्याच्या प्रवृत्तीमुळे स्त्रियांमध्ये अपघात होण्याचे, व्यसनी असण्याचे प्रमाण देखील कमी आढळून येते. ही आहेत स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगण्याची मानसशास्त्रीय कारणे.

३. सामाजिक कारणे 

आपल्या समाजात अलीकडे स्त्री पुरुष समानता जरी चांगल्या प्रकारे वाढली असली तरी अजूनही बऱ्याच अंशी जोखमीची कामे करण्याची जबाबदारी पुरुषांवर असते. स्त्रियांची कामे तुलनेने सुरक्षित असतात.

पुरुषांच्या अंगात जास्त ताकद असल्यामुळे जोखमीची आणि कष्टाची कामे करण्याची अपेक्षा त्यांच्याकडूनच केली जाते. त्यामुळे काहीवेळा पुरुषांमध्ये अपघात होण्याचे किंवा टेन्शन आणि स्ट्रेस मुळे हृदयविकाराचे प्रमाण जास्त आढळून येते.

त्याच बरोबर आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करण्याचा देखील पुरुषांचा कल असतो. अशा दुर्लक्षामुळे देखील काही आजार लक्षात न आल्यामुळे त्यावर योग्य औषधोपचार न होता पुरुषांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आढळून येते.

त्याच प्रमाणे धूम्रपान, मद्यपान आणि इतर व्यसने यांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळून येते. हेदेखील पुरुषांच्या मृत्युदराचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरते.

बेदरकारपणे वाहने चालवणे, मारामारी आणि गुंडगिरी मध्ये सामील असणे, हिंसेची प्रवृत्ती असणे हे देखील पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. हे कारण देखील पुरुषांच्या मृत्युदराचे प्रमाण वाढवण्यास महत्त्वाचे ठरते.

अशी आहेत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगण्याची सामाजिक कारणे. आणखीही अशी कारणे असू शकतात.

तर मित्र-मैत्रिणींनो, आज आपण स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक का जगतात याची काही शास्त्रीय, मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे पाहिली. वंशवृद्धी करण्याची ताकद असल्यामुळे निसर्गाने स्त्रिया अधिक सुदृढ असतील अशी सोय करून ठेवली आहे. परंतु केवळ निसर्गावर अवलंबून न राहता स्त्रियांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे. त्याच प्रमाणे दीर्घायुषी होण्यासाठी पुरुषांनी देखील आपल्या प्रकृतीची काळजी घेणे, व्यसने न करणे इत्यादी बाबींकडे लक्ष पुरवले पाहिजे.

ह्या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख जरूर शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।