कोकणातील कातळशिल्पांमधून कोणता इतिहास उलगडतो?
हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्त दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे.