गाढविणीचे दूध ५००० रुपये प्रतिलिटर इतके महाग का आहे? त्याचे आर्श्चर्यकारक फायदे काय?
ही गोष्ट खरी आहे. गाढविणीचे दूध हे अतिशय उपयुक्त आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ते चक्क मानवी दुधाच्या जवळ जाणारे आहे. त्यात प्रोटीनची मात्रा कमी असली तरी लॅक्टोजची मात्रा जास्त असते. तसेच ह्या दुधात फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. परदेशातील अनेक नोकरदार महिला आपल्या तान्ह्या मुलांना हल्ली गाढविणीचे दूध देत आहेत.