चढता सुरज धीरे, धीरे ढलता है ढल जायेगा…

चढता सुरज धीरे, धीरे ढलता है ढल जायेगा

अनेक अतिशय धडाडीचे, प्रचंड कार्यक्षम माणसांना मी अगदी जवळून पाहिले आणि हेही पाहिले की त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या आजूबाजूचे लोक, नातेवाईक त्यांच्या फटकळ बोलण्याने आणि त्यांच्या स्वतःला सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ समजण्याच्या सवयीने मनाने दूर होत गेलीत, परंतु अतिशय जवळच्यानी प्रेमाखातर किंवा सामाजिक बांधिलकी मुळे त्यांना अतिशय खंबीर साथ दिली.

नियती, डेस्टिनी हा शब्द तुम्ही पॉझिटिव्ह घेता कि निगेटिव्ह?

नियती डेस्टिनी हा शब्द तुम्ही पॉझिटिव्ह घेता कि निगेटिव्ह?

श्रद्धा थोडा वेळ बाजुला ठेऊन डोळस पणाने विचार केला तर त्या गूढ ह्या शब्दाचे कोडे थोडे सोपे होईल का? जन्माने पहिला पांडव असुन, आईच्या एका चुकी मुळे जो एकशे एकावा कौरव झाला… सूतपुत्र म्हणुन हिणविला गेला…. याला त्याची नियती जबाबादर?

कुठे हरवले रोजच्या जगण्यातले चार्जिंग पॉईंट?

चार्जिंग पॉईंट

एके काळी प्रचंड मोठी कुटुंबं आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे किती तरी विविध चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्याची कमी भासली तर जोडीला आपले मित्र मैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत.

मराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर

मराठा आरक्षण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही संपूर्ण राज्याची इच्छा आहे. म्हणूनच या मागणीला कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षण घोषित करत असेल तर राज्य सरकरचे अभिनंदन करत संपूर्ण राज्य याचा आनंद साजरा करेल. फक्त हा निर्धोक असावा. लोकसभा निवडणूका जेमतेम सहा महिन्यावर आल्या असताना मराठा आरक्षणावर निर्णय घेतल्या जातोय, त्यामुळे फक्त निवडणुकांच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाऊ नये.

विद्यार्थी हा ग्राहक असल्याचा ग्राहक आयोगाचा निर्वाळा मारक कि तारक?

Grahak Aayog

विद्यार्थी हा देखील ग्राहक असल्याचे आयोगाने केलेले विद्यार्थ्याचे वर्णन शिक्षण संस्थांच्या बाजारीकरणावर शिक्कामोर्तब करणारे आहे. शिष्याचा ग्राहक बनून विद्यार्थी आपल्या हक्काचं रक्षण करू शकेल कि नाही, हे सांगता येणार नाही.

शाकाहार विरुद्ध मांसाहार…. हि तर फक्त खाद्यसंस्कृती!! खा आणि खाऊही द्या.

शाकाहार मांसाहार

आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाणं टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. अन्न हे फक्त पोषक द्रव्याची सरमिसळ न राहता ते माणसाच्या जीभ, नाक, डोळे, त्वचा अशा सर्व संवेदनांना उद्दीपित करणारा उच्च प्रतीचा शृंगार बनून जातो. इतर कोणत्या प्राणीमात्रात हे आढळते?

love, लग्न, Divorce : आग का दरिया है, डूब के जाना है !

Divorce

असे कितीतरी आजी-आजोबा आपल्याला भेटतात आणि एकमेकांसोबत ते खूप छान दिसतात. intimacy हळूहळू निर्माण करावी लागते. ह्यासाठी दुसऱ्याच्या आवडी-निवडीबद्दल आदर, विचारांबद्दल आदर, आपल्यापेक्षा वेगळं असण्याचा स्वीकार, विश्वास असणे खूप गरजेचे असते. जेंव्हा पार्टनर म्हणून समान विचारांची, समान तत्वांची व्यक्ती निवडली जाते तेंव्हा intimacy लवकर निर्माण होऊ शकते. अर्थात, त्यासाठी पुन्हा कमीटमेंट असावीच लागते.

#Me Too मी सुद्धा!

#Me Too

गेल्या वर्षी हॉलिवूडमध्ये खळबळ माजवणार्‍या ‘मी टू’ या मुक्तमाध्यमांवरील अभिव्यक्तीला सध्या एका चळवळीचे रूप आल्याचे दिसते. लैंगिक शोषण झालेल्या अनेक महिला आता समाजमाध्यमांवर मुक्तपणे आपल्याबाबत झालेल्या घटनांचा मोकळेपणे आणि मोठ्या धाडसाने उच्चार करीत आहेत. त्यामुळे ‘महिलांचे लैंगिक शोषण’ हा प्रदीर्घ काळापासून चर्चिला जाणारा विषय आता वेगळ्या प्रकारे चर्चेला आला आहे.

हवामान बदलाचे गहिरे संकट!

हवामान

यासाठी उच्चशिक्षीत युवकांनी शेतीला एक आव्हान म्हणुन स्विकारावे, आणि आपल्या ज्ञानाचा वापर शेती विकसितकरणासाठी उपयोगी आणावा. आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने फार मोठी झेप घेतली स्वप्नवत वाटणार्‍या अनेक गोष्टी विज्ञानाने सहजशक्य बनविल्या पण शेती व्यवसाय या तंत्रज्ञानापासून काहीसा दुरच राहीला असल्याचे दिसते.

‘जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश’ कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरील निर्बुद्ध गदारोळ

दिनकर मनवर

जवळपास ५० ओळींच्या या कवितेत कविॅनी समाजासमोर आजच्या वर्तमानातलं दाहक वास्तव मांडलं आहे. “किंवा अदिवासी पोरींच्या स्तनांसारखं जांभळं” या पाच शब्दांच्या ओळीकडे सर्वांचं लक्ष गेल. त्यातही या ओळीतील पाच शब्दांमधील ‘स्तन’ ह्याच शब्दाकडे जास्त लक्ष गेलं असण्याचीच शक्यता जास्त आणि मग पुढचं सगळं घडलं असावं.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।