सोन्याच्या दगिन्यांवर हॉलमार्क होणार कंपल्सरी
१६ जून, २०२१ पासून केंद्र सरकारने सर्व सोनारांना सोन्याचे दागिने आणि वस्तूंना हॉलमार्किंग करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच आजपासून फक्त हॉलमार्क प्रमाणपत्र असलेले दागिने आणि वस्तुच सोनार विकू शकतील. पण हे हॉलमार्किंग म्हणजे आहे तरी काय? आपल्याला त्याचा काय फायदा? आणि आपल्याकडे आधीचे हॉलमार्किंग नसलेले दागिने असतील तर त्यांचं काय? आज आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.