एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक, त्यांची लक्षणे आणि कारणे
एचआयव्ही हा एक व्हायरस (विषाणू) आहे जो अफ्रीकेतल्या चिमपॅनझी माकडातून सर्वप्रथम माणसांमध्ये आला. माणसांमध्ये आल्यावर या विषाणूने माणसाच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करायला सुरुवात केली म्हणून त्याचे नामकरण एचआयव्ही, म्हणजे ‘ह्युमन इम्यूनोडेफीशीअन्सी व्हायरस’ असे करण्यात आले.