बहुरुपी जादूगार – श्रावण मास
ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हानंतर हळूच कुस बदलून येणारा वर्षाऋतू. ऊन-पावसाच्या झिम्मापाण्याचा खेळ, व्रतवैकल्ये, सणवार, मौजमस्ती म्हणजेच श्रावण! कुसुमाग्रजांनी त्याला हासरा, नाचरा, जरासा लाजरा, सुंदर, साजिरा अशा उपमा दिल्या. त्यांच्याप्रमाणेच अनेक कवींनी त्याच्या लावण्याला आपल्या लेखणीने कवेत घेण्याचा प्रयत्न केला.