२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
आपण गणित शिकतो, भाषा शिकतो पण संविधान कधी शिकतो का? आता शाळेतील प्रत्येक पाठ्यपुस्तकात संविधानाची उद्देशिका छापलेली आहे. संविधानाची ओळख होण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे हे निश्चित. भारतीय नागरिक होण्यासाठी किमान प्रशिक्षण असा त्याचा अर्थ होतो.