काय आहे नागपूरच्या काळ्या इडलीचे वास्तव आणि समजून घ्या ती खावी, कोणी खाऊ नये
पांढर्याशुभ्र इडलीमध्ये काही वेळेला गाजर, वाटाणे वगैरे घातले जातात. पण, चक्क काळी इडली!! याची तर तुम्ही कल्पना ही करू शकत नाही बरोबर ना? अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही जगात घडतात. काळ्या इडलीचं हे आश्चर्य नागपुरात घडलेलं आहे. मूळचे दाक्षिणात्य असणारे कुमार एस. रेड्डी यांनी ही काळी इडली नागपूरमध्ये लोकप्रिय केली आहे.