मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काय करावं?
मोबाईल मध्ये ही माहिती आहे असं म्हटल्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी ती माहिती साठवून ठेवायला विसरतो. गर्दीच्या ठिकाणी कोणीतरी मोबाइलची चोरी करतो, किंवा चुकून एखाद्या ठिकाणी आपण मोबाईल विसरुन येतो. अशावेळी आपला हात मोडला असं वाटतं. पण आपली माहिती वापरली गेली तर होणारं नुकसान प्रचंड असतं. मग अशी वेळ आपल्यावर आली तर काय करता येईल?