आहार कसा असावा….
काहिंना आवडत्या पदार्थांना दिलेल्या फोडणीचा वास आला तरी लाळ सुटु लागते. मांजर किंवा कुत्रा यांच्या गंधज्ञानालाही लाजवेल असे काहिंचे ऊपजत गंधज्ञान असते. अशा व्यक्तींना चुकवून काहि खाणे म्हणजे अगदि असंभव. कोणीतरी येथे पेरु खात आहे असे म्हणत मधल्या सुट्टित पेरु खाणार्यापर्यंत पोचणारी खारुताई सुद्धा मी पाहिली आहे.