अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि झाला तर तत्काळ काय करावे?
अपघात हे अचानक ओढवलेले अनैच्छिक संकट असते. प्रवास करतांना आपला अपघात घडावा अशी कुणाचीही अपेक्षा स्वाभाविक नसणारच. बहुतेकवेळी वाहन चालविताना आपली चूक नसतांनाही दुसऱ्या कुणाच्या चुकीचे आपण शिकार ठरतो. सुरक्षित वाहन चालविण्याचे नियम न जपल्याने दुसऱ्या कुणावर संकट आपल्यामुळे का यावे याचा विचार करून वाहन चालविले पाहिजे.