कोरोना नसताना काळ्या बुरशीचा संसर्ग होऊ शकतो का, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
नोव्हेंबर २०१९ पासून कोरोना विषाणूनं जगाला हादरवलय. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा हा विषाणू नेमका काय आहे, त्याचे नेमके काय परिणाम दिसतात याचा कोणताच अंदाज कोणाला नव्हता. वरवर दिसणारी लक्षणं पाहून रुग्णाला औषधं मिळायची. पण प्रतिकार शक्ती किती कमी झाली याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या आजारातून बरं झाल्यावर पुन्हा कोणता वेगळाच आजार उद्भवू शकेल याची शक्यता सांगणं कठीण होतं.