पुरुषांमध्ये वाढणारा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वेळीच ओळखा
लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना? सर्वसाधारणपणे स्तनाचा कर्करोग म्हटले की आपण हा स्त्रियांना होणारा आजार आहे असे गृहीत धरतो. परंतु अगदी कमी प्रमाणात का होईना पण पुरुषांना देखील हा आजार होतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाची उदाहरणे दुर्मिळ आहेत.