भोजनस्थान कसे असावे…..
निसर्गरम्य वातावरणात जेवणाची मजा काही औरच असते. विशेषतः कष्ट करुन सुर्य डोक्यावर आल्यावर झाडाखाली विसावा घेऊन खाल्लेल्या चटणी, तेल, भाकरीची चव कित्येक वर्षांनी सुध्दा तो प्रसंग आठवताच जिभेवर जशीच्या तशी जाणवते. एखाद्या बागेत जेवताना जेवणाचा स्वाद खुपच रुचकर वाटतो नि एरव्हिपेक्षा चार घास जास्त जेवण सरते.