हृदय निरोगी ठेवण्याचे ८ उपाय: हृदयाची काळजी कशी घ्यावी | मनाचेTalks
हृदय निरोगी ठेवण्याचे उपाय जाणून घ्या — व्यायाम, योग्य आहार, ताण कमी करणे आणि आयुर्वेदिक टिप्ससह हृदयाचे संरक्षण करा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
हृदय निरोगी ठेवण्याचे उपाय जाणून घ्या — व्यायाम, योग्य आहार, ताण कमी करणे आणि आयुर्वेदिक टिप्ससह हृदयाचे संरक्षण करा.
कधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची. ह्र्दयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही. कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.