संभाव्य आर्थिक संकटे आणि त्यांना तोंड देण्यासाठी करता येण्यासारखी तरतूद

आर्थिक संकटांना तोंड कसे द्यावे

अचानक येतात ती संकटे, त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते. संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण यासाठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात. व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स, आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ‘ शेखचेल्ली ‘ चा धडा होता. तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता. पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत. आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो.