मेडिटेशन – स्वतःची स्वतःशी अपॉइंटमेंट
बुद्धी, मन, शरीर यात सतत चालु असलेले conflict सोडवणं म्हणजे मेडिटेशन, कसं ते समजून घ्या या लेखात…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
बुद्धी, मन, शरीर यात सतत चालु असलेले conflict सोडवणं म्हणजे मेडिटेशन, कसं ते समजून घ्या या लेखात…
जशी बाह्य गुलामगिरी आपल्याला सहन होत नाही तर आपला आनंद आपण दुसऱ्यावर अवलंबून का ठेवावा? मग हि आंतरिक म्हणजे मानसिक गुलामगिरीच तर झाली. आणि आपल्या आत काय होणार ते दुसऱ्याने ठरवणं हा गुलामीचा सर्वात वाईट प्रकार आहे. तुमच्या आजूबाजूचं जीवन १००% तुम्हाला हवं तसं कधीच असू शकत नाही. तर अशा परिस्थिती तुमचं सुख तुमच्या आजूबाजूला काय घडतं यावर अवलंबून न ठेवणं तुम्हाला जमलं पाहिजे.
मनोव्यापार हा बिगर भांडवली व्यापार आहे. कोणत्याही इतर व्यापारापेक्षा महत्वाचा. समजा आपण एखाद्या व्यापारात करोडो रुपये संपत्ती कमावली पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संप्पन्न जीवन शून्य होऊ शकतं.