‘सा रे ग म प’ चा ध्वनी ऐकवणारे हंपी मधले विजया विठ्ठल मंदिर.
ह्या मंदिरातील तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणजे इकडे असलेला सा, रे, ग, म मंडप. नावावरून लक्षात आल असेलच कि भारतीय संगीतात असलेल्या सप्तसुरांवर आधारित असलेला हा मंडप आहे. ह्या मंडपाचे ५६ खांब म्हणजे एका रहस्यमयी तंत्रज्ञानाचा आविष्कार आहेत. ह्या खांबावर हाताने मारल असता त्यातून ध्वनीची निर्मिती होते.