औषधे घेताना काय काळजी घ्यावी?
औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात. शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो.