फोटोच्या निगेटिव्हकडे टक लावून पाहिल्यास दिसते रंगीत चित्र! कसा घडतो हा चमत्कार?
हे आहे ‘ऑप्टिकल फोटो ईल्युजन’ म्हणजेच दृष्टीसातत्य. एखाद्या फोटोच्या निगेटिव्हवरुन रंगीत प्रिंट काढायची असेल तर डार्क रूमची गरज लागते परंतु आपल्या डोळ्यांना मात्र डार्क रूम शिवायच अशी रंगीत इमेज दिसु शकते. आपला मेंदू आणि दृष्टी ह्यांच्या एकत्रित काम करण्याने हा चमत्कार घडतो. कसे ते आपण जाणून घेऊया.